युवकांची शरीरे आणि मने कणखर बनवण्यासाठी मैदानी खेळांशिवाय पर्याय नाही- आशुतोष काळे

मानवी जीवनात शारिरीक क्षमतेबरोबरच इतर महत्वाच्या गुणांचा विकास होण्यासाठी मैदानी खेळांचा उपयोग होतो. मैदानावरील कोणत्याही खेळामुळे त्या व्यक्तिमधील इतर सुप्त गुणांना चालना मिळते. व्यक्तिमत्व विकासात व शारीरीक क्षमता वाढविण्यासाठी मैदानी खेळाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे कोणत्याही वयात जो म्हणून खेळ खेळता येईल तो आणि ज्यांच्याबरोबर खेळता येईल त्यांच्याबरोबर खेळा. त्याने आरोग्य सुधारेल, ताजेतवाने वाटेल आणि जीवनातल्या आव्हानांना सामोरे जायची उभारी येईल. आजची युवा शक्ती हे या देशाचे उद्याचे भविष्य आहे. या युवकांची शरीरे आणि मने कणखर बनवण्यासाठी मैदानी खेळांशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी केले. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे एकता व्हॉलीबॉल क्लब यांचे वतीने भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिवस-रात्र खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण ३५ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे ७०००/- रुपयांचे पहिले पारितोषिक साकुर मांडवे येथील श्रीराम व्हॉलीबॉल संघाने पटकाविले, ५०००/- रुपयांचे दुसरे पारितोषिक कुंभारी येथील प्रतापदादा कदम व्हॉलीबॉल संघ, ३०००/- रुपयांचे तृतीय पारितोषिक धोत्रेच्या एकता व्हॉलीबॉल क्लब तर १५००/- रुपयांचे चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी कोपरगावचा संघ ठरला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, कोपरगाव तालुका जीन्निग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, सुनील शिलेदार, तात्यासाहेब काटे, बाळासाहेब माळवदे, दादासाहेब जामदार, सिद्धांत भागवत, आण्णासाहेब राजगुरू, राजेंद्र माळवदे, निवृत्ती जामदार, आण्णासाहेब राजगुरू आदी मान्यवरांसह व्हॉलीबॉल शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी एकता व्हॉलीबॉल क्लबच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram