सरकारच्या फसव्या कर्जमाफीचे पाप आमदार कोल्हेंना भोगावे लागेल- आशुतोष काळे

पुणतांब्यासह राज्यातील शेतक-यांचे आंदोलन अजुन दोन दिवस चालले असते तर शेतक-यांना न्याय मिळाला असता. परंतु शेतक-यांचे आंदोलन आमदार कोल्हे यांनी मोडीत काढल्यामुळे बहुसंख्य शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले असून सरकारच्या फसव्या कर्जमाफीचे पाप आमदार स्नेहलता कोल्हे यांना भोगावे लागेल अशी टीका युवानेते आशुतोष काळे यांनी केली. कोपरगाव शहरामध्ये राष्ट्रवादीच्या हल्लाबोल अंदोलनाच्या सभेत आशुतोष काळे यांनी विकासाचे प्रश्न विचारून केलेल्या टीकेने सैरभैर झालेल्या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रतिउत्तर देण्यासाठी आशुतोष काळे यांनी पत्रकार परिषद घेवून त्यांच्या सर्वच टीका टिप्पनिंना समर्पक व सडेतोड उतर देवून त्यांची बोलती बंद केली आहे. आशुतोष काळे पुढे म्हणाले की, शहरातील हल्लाबोल अंदोलनाच्या सभेला अभुतपुर्व गर्दी पाहून विरोधकांना धास्ती वाटत आहे. हल्लाबोलच्या सभेने संपुर्ण तालुक्यासह राज्याचे वातवरण बदलत आहे. कोपरगावच्या इतिहासातील सर्वांत मोठी सभा झाल्याने विरोधकांनी सभा झाल्याबरोबरच सभेचा निषेध करण्यास सुरवात केली. त्यामुळे मुळ प्रश्नाला बगल देऊन काहीतरी विषय काढुन विचलीत करण्याचे काम आमदार कोल्हे करीत आहेत. विकासाच्या बाबतीत प्रश्न विचारले की, मी महिला आमदार आहे असं सांगतात. मागील साडे तीन वर्षा पासुन हे असेच रडगाणे चालु आहे. आमदार कोल्हे यांचा २०१४ च्या निवडणुकीत कोणत्याही कर्तुत्वाचा विषय नव्हता केवळ लाटेमुळे निवडून आल्या आहे. मतदार संघात १०० दिवसात १०० कोटीचे विकास कामे केल्याच्या वल्गना करतात, मात्र प्रत्यक्षात झालेला विकास कुठेच दिसत नाही. याउलट माजी आमदार अशोकराव काळे यांच्या काळात कोपरगाव शहरात तहसील कार्यालय, न्यायालयाची इमारत, ग्रामीण रुग्णालय, पशु वैद्यकीय दवाखाना, गोदावरी नदीवर ठिकठीकाणी बांधलेले पूल झालेल्या विकासाची साक्ष देत आहेत. तालुक्याच्या आमदार सौ. स्नेहलता काकु यांना गाजराची उपाधी दिली. पण या सरकारलाच गाजराची उपमा जनतेने दिली आहे. त्यात कोणतीही अश्लीलता नाही असेही काळे म्हणाले. आमदार स्नेहलता काकू नेहमी मला मुला सारखे समजतात मग कोणती आई आपल्या मुलाचा पुतळा दहन करण्यास कार्यकर्त्यांना संगु शकते असाही प्रश्न काळे यांनी केला आहे. या पत्रकार परीषदेच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनिल गंगुले, गटनेते विरेन बोरावके, नगरसेवक मंदार पहाडे, संदिप पगारे, हिरामन गंगुले, गणेश लकारे, वाल्मिक लहिरे, नवाज कुरेषी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram