स्व. शंकरावजी काळें च्या रयत मधील योगदानाला जिल्ह्यात जोड नाही - दादाभाऊ कळमकर

रयत शिक्षण संस्थेच्या हिताचे निर्णय घेवून अहमदनगर जिल्ह्यात ज्या काही शाळा महाविद्यालय स्व. माजी खासदार शंकररावजी काळे साहेबांनी सुरु केल्या व फक्त सुरूच केल्या नाही तर या संस्थाना भरीव आर्थिक मदत करून रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष संपूर्ण जिल्हाय्त फुलविण्याचे काम त्यांनी केले असून या वटवृक्षाच्या पारंब्या आज करंजी विद्यालायाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पसरल्या त्या केवळ स्व. काळे साहेबांमुळे. त्यांनी केलेले कार्य व संस्थेसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. स्व. काळे साहेबांचे जेवढे योगदान रयत शिक्षण संस्थेसाठी आहे तेवढे योगदान या अहमदनगर जिल्ह्यात दुस-या कुणाचे नाही असे छातीठोकपणे सांगत त्यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी दिलेल्या योगदानाला अहमदनगर जिल्ह्यात जोड नाही असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग सल्लागार समितीचे अध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांनी कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे केले. कोपरगाव तालुक्यातील करंजी बुII येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयाच्या नवीन चार खोल्यांचा भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार अशोकराव काळे होते. ते पुढे म्हणाले की, स्व. काळे साहेब जिल्ह्याचे सज्जन, सतशील नेतृत्व होते. आपल्या संपूर्ण जीवनात विकासाचे व सेवेचे राजकारण त्यांनी केले. कधीही जिरवाजीरवीचे राजकारण त्यांनी केले नाही. मी एक साधा कार्यकर्ता असतांना व रयत शिक्षण संस्थेचा सभासद नसतांनाही स्व. साहेब रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन असतांना त्यांनी मला रयत मध्ये काम करण्याची संधी दिली. नगर शहरात व जिल्ह्यात त्यांनी पसरविलेले शाळा-महाविद्यालयांचे जाळे व महिला महाविद्यालयांची संख्या पाहिल्यास जर साहेबांनी मनावर घेतले नसते तर कित्येक मुली आज शिक्षणापासून वंचित राहिल्या असत्या. शरदचंद्र पवार साहेवांनी महिलांना प्राधान्य देवून आरक्षण दिल्यामुळे आज महिला वायुदलात वैमानिक होऊन गगन भरारी घेत आहेत. विविध क्षेत्रात नामांकित संस्थेमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करीत असून आज महिला सक्षम होण्याचा पाया रयत शिक्षण मध्ये रचला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे वतीने विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या कामासाठी रुपये पाच लाखाचा धनादेश अध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांनी माजी आमदार अशोकराव काळे यांच्याकडे सुपूर्द केला. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना माजी आमदार अशोकराव काळे म्हणाले की, स्व. साहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कर्मवीर भाऊराव पाटलांना दिलेल्या वचनांचे कधीही विस्मरण होऊ दिले नाही व शिक्षणाचा बाजारही होऊ दिला नाही. स्व. शंकररावजी काळे साहेबांनी समाजालाच स्वत:चे कुटुंब समजून रयत शिक्षण संस्थेचा विस्तार केला. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी सुरु केलेले अनेक महाविद्यालय स्त्री शिक्षणाविषयीची त्यांच्या मनातील आत्मीयता स्पष्ट करीत असून साहेबांनी या भागातील विद्यार्थ्यांचे माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी म्हणून विद्यालय सुरु केले पण यापुढे फक्त १० वी पर्यंतच न थांबता उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक पद्मकांत कुदळे,सचिन रोहमारे,सुनील शिंदे, अशोकमामा काळे, हरिभाऊ शिंदे, सुधाकर रोहोम, राजेंद्र मेहेरखांब, सचिन चांदगुडे, अरुण चंद्रे, संजय आगवन, आनंदराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक साळुंके, एस. एस. जी. एम. चे प्राचार्य किशोर काकडे, महेश पाटील, विकास जोरी, बिल्डिंग सुपरवायझर बापू नलगे, पंचायत समितीचे उपसभापती अनिल कदम, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद साबळे, रोहिदास होन, गौतम बँकेचे उपाध्यक्ष अनिल महाले, दिलीप बोरणारे,चांगदेव आगवन ,मुकुंद आगवन, त्र्यंबक बोठे, नाथाजी आगवन, आप्पासाहेब आगवन, नवनाथ आगवन, भास्करराव आगवन,करंजीचे सरपंच छबूराव आहेर,पोलीस पाटीलअनिल चरमळ, स्कुल कमिटीचे सदस्य डॉ. सुनील देसाई, सांडूभाई पठाण, अष्पाक इनामदार कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक सुनील पाठक यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय जनरल बॉडी सदस्य स्कुल कमिटीचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी केले. सूत्रसंचालन अरुण चंद्रे व जगताप एल.पी.यांनी केले तर आभार सांडूभाई पठाण यांनी मानले यांनी मानले. यावेळी विविध शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, करंजी ग्रामस्थ व शिक्षक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram