प्रेम, बंधुत्व व सलोखा जपण्याची शिकवण देणारा नाताळ सण – आशुतोष काळे

आपल्या देशात विविध जाती धर्माचे सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. प्रयेक जाती धर्माच्या सण, उत्सव साजरे करण्यामागे विशिष्ट परंपरा व धार्मिक भावना जोपासल्या जातात. त्याच प्रमाणे ख्रिश्चन बांधवही मोठ्या धार्मिक भावनेतून उत्साहात नाताळ सण साजरा करतात. हा नाताळ सण प्रेम, बंधुत्व व सलोखा जपण्याची शिकवण देणारा आहे असे प्रतिपादन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. नाताळ सणानिमित्त कोपरगाव शहर तसेच तालुक्यातील विविध चर्चेमध्ये जावून त्यांनी ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ते बोलत होते. नाताळ सनानिमित्त युवानेते आशुतोषदादा काळे यांनी कोपरगाव येथे चर्चला तसेच दयासागर मित्रमंडळातर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेलाही भेट दिली. यावेळी त्यांनी फादर व ख्रिश्चन बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी फादर रेव्हरेंट अजय भोसले, फादर जॉर्ज, दयासागर मित्रमंडळाचे अध्यक्ष योहान पाटोळे यांनी यावेळी युवानेते आशुतोषदादा काळे यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, नगरसेवक संदीप पगारे, विद्यार्थी अध्यक्ष सागर लकारे, अशोक आव्हाटे, कृष्णा आढाव राजन त्रिभुवन आदि उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram