कोपरगाव तालुक्याचा १०० कोटीचा निधी हरविला? – आशुतोष काळे

तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी १०० दिवसात १०० कोटी निधी आणल्याच्या घोषणा करून नेहमीप्रमाणे पेपरबाजी केली होती. पण आज झगडे फाटा-वडगाव पान रस्त्यासह कोपरगाव तालुक्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था पाहिल्यास कोपरगाव तालुक्यात १०० कोटी तर सोडाच पण एक कोटीचा सुद्धा निधी तालुक्यात कुठे आल्याचे दिसत नसून कोपरगाव तालुक्याचा १०० कोटीचा निधी हरविला तर नाही ना? असा प्रश्न कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधी सौ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता विचारला. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या माजी पदाधिका-यांनी युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी व पणन महामंडळाकडे चांदेकसारे बाजार तळाच्या सुशोभीकरणासाठी निधी मागणी केली होती. कृषी व पणन महामंडळाने या मागणीचा सकारात्मक विचार करून चांदेकसारे ग्रामपंचायतीला रुपये २५ लाख निधी मजूर करून हा निधी ग्रामपंचायतीला प्राप्त झाला असून या निधीतून बाजारतळ सुशोभिकरणाच्या कामाच्या शुभारंभ आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णू होन होते. आज कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते हे समजेनासे झाले आहे. झगडे फाटा-वडगाव पान रस्त्यासह सर्वच रस्त्याची अवस्था पाहून तर आता असे वाटायला लागले की, या रस्त्यावर जो टोलनाका सुरु होता तो आजही सुरु असायला हवा होता का? असा मिस्कील सवाल केला. यावरून कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचा कारभार कसा चालू आहे हे तालुक्याच्या जनतेला कळेनासे झाले आहे. जनतेने दिलेल्या संधीचे सोने त्यांना करता येत नसून सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी असतांना विकास कामांसाठी निधी मिळविण्यातही त्यांना अपयश येत असल्यामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाल्याचे आशुतोष काळे म्हणाले. समृद्धी महामार्गाच्या बाबतीत काही शेतक-यांवर अन्याय झाला असून त्यांच्या जमिनीचा त्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करून त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत चांदेकसारे गावासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. या बंधा-याचा ठराव जिल्हा परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला असून या कामाला सुद्धा लवकरच सुरुवात होणार असल्याचे आशुतोष काळे यांनी सांगितले. चांदेकसारे बाजारतळाचे संपूर्णपणे सुशोभिकरण करण्यात येणार असून यामध्ये ५० बाय १२ फुटाचे नवीन चार ओटे, संपूर्ण जुन्या व नवीन ओट्यऻवर पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी ५००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय व संपूर्ण बाजारतळ परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार असून हे काम तीन महिन्याच्या आत पूर्ण होणार आहे. या कामाच्या शुभारंभप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसया होन, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, काकासाहेब जावळे, माजी संचालक डॉ. गोरक्षनाथ रोकडे, राहुल रोहमारे, माजी सरपंच मतीन शेख, लाला होन, भीमा होन, नूरमहंमद शेख, भैया सय्यद, गोकुळ गुरसळ, पंकज पुंगळ, शंकर चव्हाण, युनुस शेख, दगू होन, भास्कर होन, चंद्रकांत होन, दादासाहेब होन, द्वारकानाथ होन आदी मान्यवरांसह चांदेकसारेचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नारायण होन यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram