कोपरगावचे साईभक्त मोठ्या संख्येने साईचरणी नतमस्तक

श्री. साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव व माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पुण्यस्मरणार्थ कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या साईकथा महोत्सवानिमित साईबाबांच्या पादुका कोपरगाव शहरात दाखल होताच हजारो साईभक्तांनी साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेवून हजारो साईभक्त साईचरणी नतमस्तक झाले. प्रियदर्शनी महिला मंडळ कोपरगाव व साई मंजिरी प्रतिष्ठान कोपरगाव यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १६/१२/२०१७ पासून शुक्रवार दिनांक २२/१२/२०१७ या सप्ताहात ह.भ.प.साई कथाकार कैलास महाराज राजगुरू यांच्या रसाळ वाणीतून माजी आमदार अशोकराव काळे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या भव्य प्रांगणात श्री साई संगीतमय कथा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त गुरुवार दिंनांक २१/१२/२०१७ रोजी सकाळी १०.०० वाजता साईबाबांच्या पवित्र पादुका साईबाबा तपोभूमी कोपरगाव येथे आणण्यात आल्या. प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते हस्ते हजारो साईभक्तांच्या उपस्थितीत या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी साईबाबा तपोभूमी ते साईकथा महोत्सव स्थळापर्यंत मोठ्या भक्तीमय वातावरणात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या साईपादुकांच्या मिरवणूक मार्गावर सुवासिनींनी सडा रांगोळी काढली होती. मिरवणूक सुरु असतांना कोपरगाव शहरातील चौकाचौकात साईभक्तांनी साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेतले तर सुवासिनींनी व महिला भगिनींनी पूजन करून दर्शनाचा लाभ घेतला. मिरवणुकीत तल्लीन झालेल्या साईभक्त महिलांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. मोठ्या संख्येने साईभक्त या मिरवणुकीत सामील झाल्यामुळे संपूर्ण कोपरगाव शहर साईभक्तीच्या रसात न्हावून निघाले. साईबाबांच्या पादुका साईकथा महोत्सवस्थळी दाखल झाल्यानंतर युवा नेते आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पादुकांचे पूजन करून दर्शन घेतले. साईंच्या पादुका दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले. या साईपादुका गुरुवारी रात्री १० वाजेपर्यंत साईभक्तांना दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. कोपरगाव शहरात प्रथमच आगळावेगळा श्री साई संगीतमय कथा महोत्सवाला साई भक्त विशेषत: महिला साईभक्तांची गर्दी उलेखनीय असून दिवसेंदिवस साई कथा ऐकण्यासाठी गर्दी वाढतच आहे. कोपरगाव शहरातील साई भक्तांना साई कथा व साईपादुकांच्या दर्शनाचा लाभ मिळवून दिला याबद्दल कोपरगाव शहरातील साईभक्तांनी प्रियदर्शनी महिला मंडळ कोपरगाव व साई मंजिरी प्रतिष्ठानचे आभार मानले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram