शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक १४/१२/२०१७ रोजी सकाळी ७.०० वाजता आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला कोपरगाव शहर तसेच तालुक्यातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विजयी स्पर्धकांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात आले.माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी प्रवेश घेणा-या स्पर्धकांना मोफत प्रवेश देण्यात आला होता. ही स्पर्धा श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरु झाली. या स्पर्धेला युवा नेते आशुतोष काळे यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेत जवळपास एक हजाराच्या वर स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत मुलींसाठी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून श्री. छत्रपती संभाजी चौक, आचारी हॉस्पिटल स्पर्धेचे ठिकाण असे ३ की.मी. अंतर ठेवण्यात आले होते. इयत्ता ८ वी ते १० वीच्या मुलांसाठी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून नगरपालिका, सम्यकनगर, श्री. छत्रपती संभाजी चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते स्पर्धेचे ठिकाण असे ५ किलोमीटर अंतर व खुल्या गटासाठी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून श्री. छत्रपती संभाजी चौक, नागरे पेट्रोलपंप, मुर्शतपुर फाटा त्याच मार्गाने परतीचा प्रवास असे १० किमीचे अंतर ठेवण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेतील इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत मुलींच्या गटातील प्रथम पारितोषिक रोख रुपये ३,००१/- व चषक ओम गुरुदेव इंग्लिश मेडीयम स्कूलची विद्यार्थिनी कु. पावरा रिंकू हिने पटकाविले, द्वितीय पारितोषिक रोख रुपये २,००१/- व चषक, कु. माळी अंकिता ओम गुरुदेव इंग्लिश मेडीयम स्कूल, तृतीय पारितोषिक रोख रुपये १,००१/- व चषक कु. वसावे नेहा ओम गुरुदेव इंग्लिश मेडीयम स्कूल, चतुर्थ पारितोषिक रोख रुपये ७०१/- व चषक कु. भरसक साक्षी ओम गुरुदेव इंग्लिश मेडीयम स्कूल, पाचवे पारितोषिक रोख रुपये ५०१/- व चषक कु. कडू अंकिता ओम गुरुदेव इंग्लिश मेडीयम स्कूल, उत्तेजनार्थ कु. गुरसळ निशा न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे, कु. काळे रुपाली स्वप्नपूर्ती अॅकॅडमी कोपरगाव, इयत्ता ८ वी ते १० वीच्या मुलांच्या गटात प्रथम पारितोषिक रोख रुपये ३,००१/- व चषक सेवानिकेतन इंग्लिश मेडीयम स्कूल चा विद्यार्थी मुटकुळे भारत श्रीराम याने पटकाविले, द्वितीय पारितोषिक रोख रुपये २,००१/- व चषक शेळके महेश भाऊसाहेब न्यू इंग्लिश स्कूल पुणतांबा, तृतीय पारितोषिक रोख रुपये १,००१/- व चषक साबळे अजय काशिनाथ औताडे पाटील विद्यालय पोहेगाव, चतुर्थ पारितोषिक रोख रुपये ७०१/- व चषक पवार प्रदीप सोमनाथ न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे, पाचवे पारितोषिक रोख रुपये ५०१/- व चषक बर्डे ऋषिकेश लक्ष्मण ओम गुरुदेव इंग्लिश मेडीयम स्कूल, बारेला गजेश ओम गुरुदेव इंग्लिश मेडीयम स्कूल, वळवी रवी ओम गुरुदेव इंग्लिश मेडीयम स्कूल कोपरगाव, खुल्या गटामध्ये प्रथम पारितोषिक रोख रुपये ३,००१/- व चषक वटाणे लक्षण किसन के.जे.सोमय्या महाविद्यालय, द्वितीय पारितोषिक रोख रुपये २,००१/- व चषक, तांबोळी फयाज पापाभाई के.जे.सोमय्या महाविद्यालय, तृतीय पारितोषिक रोख रुपये १,००१/- व चषक गीते लव नामदेव के.जे.सोमय्या महाविद्यालय, चतुर्थ पारितोषिक रोख रुपये ७०१/- व चषक शिंदे अक्षय राजेंद्र संजीवनी, पाचवे पारितोषिक रोख रुपये ५०१/- व चषक पुंड निखील अशोक एस. एस. जि. एम. महाविद्यालय,उत्तेजनार्थ कोळे सागर अशोक व वाके ज्ञानेश्वर तुकाराम संजीवनी या स्पर्धकांना युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.अरुण चंद्रे, प्रा. अंबादास वडांगळे, प्रा. दिलीप घोडके, प्रा. को-हाळकर, प्रा. दुधाळ, प्रा.देवकर, प्रा. वीरकर, प्रा.बडजाते, प्रा.गवळे, प्रा. वानखेडे, प्रा. शेजवळ,प्रा. लकारे, प्रा.मोरे, निकम, प्रा. गगे, प्रा. थोरात, प्रा. दातीर, प्रा. गणेश घुमे आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष सागर लकारे,कार्याध्यक्ष निखील डांगे, सदस्य रवी आहेर, विशाल निकम,तेजस साबळे, कार्तिक सरदार, जय आहिरे, शुभम इंदरखे, निलेश भंडारी, शुभम लासुरे, स्वामी गोरडे, विजय आहिरे, रोहित चव्हाण, गौरव वाघ, शुभम चव्हाण, राहुल गायकवाड, राहुल हाडा,महेंद्र उगले, अभिषेक मिसाळ, गोविंद जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, सुनील शिलेदार, हिरामण गंगुले, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, डॉ. चन्द्रशेखर आव्हाड, शिवा लकारे, अशोक आव्हाटे, गणेश लकारे, राहुल देवळालीकर, मनोज कडू, एकनाथ गंगूले, रावसाहेब साठे, वाल्मिक लाहीरे,संदीप सावतडकर, नारायण लांडगे, राजेंद्र आभाळे, ऋषिकेश खैरनार, जावेद शेख, चांदभाई पठाण, संतोष टोरपे, धनंजय कहार, संकेत कडवे, बाळासाहेब शिंदे आदि मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram