कोपरगाव शहराच्या साठवण तलावाचे काम सुरु करा आशुतोष काळेंचे जिल्हाधिका-यांना साकडे

जायकवाडी धरण १०० टक्के भरलेले आहे. कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारी धरणेही आज मितीला तुडुंब भरलेले असूनही चार नंबर साठवण तलावाचे अपूर्ण असलयामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना पाच दिवसांनी पाणी मिळते. कोपरगावच्या नागरिकांना नियमितपणे पाणी मिळण्यासाठी चार नंबर साठवण तलावाचे काम तातडीने सुरु करावे असे साकडे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी अभय महाजन यांना घातले. कोपरगाव शहराचा दिवसेंदिवस वाढत असलेला विस्तार व वाढणारी लोकसंख्या याचा विचार करता कोपरगावच्या नागरिकांना पाणी पुरवठा करणारे साठवण तलाव भविष्यात कोपरगावच्या नागरीकांची तहान भागवू शकणार नाही अशी दूरदृष्टी असणारे माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांनाही कोपरगावच्या नागरिकांना नळाद्वारे नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी कोपरगाव शहराच्या पाणी साठवण तलाव क्रमांक चार साठी मोठया कष्टाने सव्वा दोन कोटी रुपये निधी मंजूर करून आणला होता. या साठवण तलावाचे कामही सुरु झाले होते. परंतु २०१५ साली या साठवण तलावाचे काम हे चौकशीच्या फे-यात अडकले होते. त्यावेळीच्या त्ताकालीन जिल्हाधिका-यांनी या कामाच्या चौकशीचे आदेश देवून दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु आजतागायत ही चौकशी पूर्ण झाली नाही व साठवण तलावाचे काम आजही बंद आहे. यावर्षी पर्जन्यमान चांगले झाले असून धरणांतही पुरेसा पाणीसाठा आहे. परंतु चार नंबर साठवण तलावाचे अपूर्ण असलयामुळे कोपरगाव शहराच्या नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे. कोपरगावच्या नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नेहमीच आवाज उठविला आहे. या तलावाचे काम मार्गी लागावे यासाठी आंदोलन व सहा महिन्यापूर्वी प्रत्यक्ष जावून जिल्हाधिक-यांना निवेदनही देण्यात आले आहे. तरीही आजपर्यंत या साठवण तलावाचे काम सुरु झालेले नाही. माजी आमदार अशोकराव काळे यांनी साठवण तलावासाठी मोठया कष्टाने मिळविलेला निधी पडून आहे. याची दखल घेत युवा नेते आशुतोष काळे यांनी तातडीने जिल्हाधिकारी अभय महाजन यांची भेट घेवून शिल्लक असलेल्या निधीमध्ये अधिकची भर घालून तातडीने चार नंबर साठवण तलावाचे काम सुरु करावे असे साकडे घातले. जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत माहिती घेवून चार नंबर साठवण तलावाचे काम लवकरात लवकर सुरु करू असे आश्वासन युवा नेते आशुतोष काळे यांना दिले आहे. त्यामुळे साठवण तलावाचे काम लवकर सुरु झाल्यास कोपरगावच्या नागरिकांची पाण्यासाठी सुरु असणारी वणवण ही कायमची थांबणार आहे. आहे. यावेळी विजयराव आढाव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव व नगरसेवक संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, , नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, सुनील शिलेदार, मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, हिरामण कहार, दिनार कुदळे, कृष्णा आढाव, फकीरमामू कुरेशी आदी उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram