आव्हानात्मक परिस्थितीत गौतम सहकारी बँकेची नेत्रदीपक कामगिरी – आशुतोष काळे | शरदराव पवार पतसंस्थेच्या सभासदांना याहीवर्षी १५ टक्के लाभांश

माजी खासदार स्व. शंकररावजी काळे साहेबांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवर व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संस्था प्रगतीपथावर आहेत. मागील आर्थिक वर्ष हे अतिशय आव्हानात्मक वर्ष होते. परंतु अशा आव्हानात्मक परिस्थितीतही गौतम सहकारी बँकेने नेत्रदीपक कामगिरी केल्याचे गौरवदगार काढत शरदराव पवार पतसंस्थेच्या सभासदांना याहीवर्षी १५ टक्के लाभांश देणार असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यानी केले. गौतम सहकारी बँक व शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्था व गौतम सहकारी कुक्कुटपालन या संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात कर्मवीर शंकरराव काळे सभागृहामध्ये माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी संथेचे जेष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने, सुनील शिंदे, अशोकमामा काळे, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, व्हा. चेअरमन अनिल महाले, शरद पवार पतसंस्थेचे चेअरमन राधु कोळपे, व्हा. चेअरमन सोपानराव गुडघे, गौतम सहकारी कुक्कुटपालन चे चेअरमन चंद्रकांत औताडे, बबनराव कोळपे, माधवराव खिलारी,एम. टी. रोहमारे, सोमनाथ चांदगुडे, कचरू कोळपे, सुखदेव कोळपे, कारखान्याचे जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे, ऑफिस सुपरिटेंडेंट बाबा सय्यद, आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात बोलतांना युवा नेते आशुतोष काळे पुढे म्हणाले की, सन २०१६-१७ बँकिंग क्षेत्रासाठी कठीण आर्थिक वर्ष असूनही सभासद व ठेवीदारांच्या विश्वासाला कुठेही तडा जावू न देता चांगली कामगिरी केली हे सहकार चळवळीच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. गौतम सहकारी बँकेला राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मानित केले असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात सभासद, ठेवीदार यांचा बॅंकेवरील विश्वास अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. आपल्या बँकेचे सर्व व्यवहार हे रिझर्व बँकेच्या नियमनानुसार चालते. अशा परिस्थितीत या संस्था आपल्या आहेत ही भावना डोळ्यासमोर ठेवून सर्व सभासद, ठेवीदार व कर्जदार यांनी बँकेच्या ठेवी वाढविणे, चांगले कर्ज वाटप करणे व १०० टक्के कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. सभेचे प्रास्तविक गौतम सहकारी बँकेचे व्यवस्थापक बापूसाहेब घेमुड यांनी केले. सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी नाना बनसोडे यांनी केले तर शरदराव पवार पतसंस्थेचे मॅनेजर बाळासाहेब काळे व पेटकर यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram