स्व. शंकररावजी काळे यांनी समाजातील प्रत्येक घटकांचा विचार केला – आशुतोष काळे

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा डोलारा सांभाळत असतांना शिक्षण महर्षी माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी फक्त कारखान्याचे हित न बघता कारखानाच नव्हे तर पंचक्रोशीतील प्रत्येक घटकांचा विचार करून प्रत्येकाला काही ना काही उद्योग व्यवसाय करण्याची संधी निर्माण करून दिली. त्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून समजातील या घटकांचा त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी मदत कशी होईल हाच विचार स्व. साहेबांनी आपल्या संपूर्ण जीवनात केला. १८० सभासद व १४४ करार धारक ट्रकला वाहतुकीचा धंदा गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी मार्फत देण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच ट्रक धारक व चालक यांच्या आर्थिक गरजा पूर्ण झाल्या आहेत. संस्था सभासदांच्या संकटकाळी वेळोवेळी धावून जाते. त्या माध्यमातून ट्रक ड्रायव्हर साबळे यांचे अपघाती निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना कंपनीने रुपये एक लाख सानुग्रह अनुदान दिले असून स्व. साहेबांच्या निस्वार्थी विचारातूनच गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी महाराष्ट्रात अग्रगण्य कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि; गौतमनगर व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे होते. गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि; गौतमनगर व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कर्मवीर शंकरराव काळे सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस सुरुवात झाली. सभेचे प्रास्तविक करतांना गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक सुभाष आभाळे म्हणाले की, माजी आमदार अशोकराव काळे व युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था नेत्रदीपक प्रगती करीत असल्याचे सांगितले. याप्रसंगी जेष्ठ संचालक छबुराव आव्हाड, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव आहेर, आनंदराव चव्हाण, राजेंद्र घुमरे, सचिन रोहमारे, सुनील शिंदे, बाळासाहेब बारहाते, सुधाकर रोहोम, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर जयंत भिडे, सेक्रेटरी सुनील कोल्हे, ऑफिस सूपरिटेंडेट बाबा सय्यद, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि; चे कार्यकारी संचालक सुभाष आभाळे, गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर दगूनाना गोरे, सर्व संचालक मंडळासह सभासद

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram