शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलकडे तालुक्याचे नेतृत्व

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा संकुल कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या तालुकास्तरीय मुलींच्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलने सलग तिस-यांदा कोपरगाव तालुक्याचे जिल्हा स्तरावर नेतृत्व करण्याचा मान पटकाविला आहे. या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींच्या १४ व १७ वर्षे वयोगटातील दोन्ही संघ आत्मा मलिक क्रीडा संकुल कोकमठाण येथे होणा-या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. गौतम पब्लिक स्कूलच्या १४ वर्षाखालील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने शारदा इंग्लिश मेडियम स्कूल व आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल यांचा सहज पराभव करून स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संजीवनी इंग्लिश मेडियम स्कूलवर १५-३ व १५-५ असा दोन सरळ सेट मध्ये दणदणीत विजय मिळविला तर १७ वर्ष वयोगटात आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल व संजीवनी इंग्लिश मेडियम स्कूलवर १५-९ व १५-११ ने विजय मिळवून अंतिम फेरीत शारदा इंग्लिश मेडियम स्कूलवर १५-८, ९-१५ व १५-७ ने विजय प्राप्त करीत दोन्ही वयोगटातील संघाने स्पर्धेत आपले वर्चस्व राखले. १४ वर्षे वयोगटातील अंतिम लढतीत साक्षी गुलदगड हिने सलामीलाच सलग ११ गुण मिळविण्याचा विक्रम केला. या संघाकडून कर्णधार सायली निकम सिद्धी क्षीरसागर, साक्षी पवार, श्रद्धा गाडे, समृद्धी पाटील व वसुंधरा वाडेकर यांनी नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन घडविले. तर १७ वर्षे वयोगटातील अंतिम लढतीत कर्णधार तेजस पाटील, नयन पाटील, साक्षी दरेकर, ऋतुजा घुमरे, कीर्ती देवरे, साक्षी आरोटे, समीक्षा बजाज, सृष्टी पाटील, हर्षदा बर्वे, सलोनी पाटील, रश्मी अंबुरे व आयेशा गायके यांनी उत्कृष्ट खेळ केला. दोन्ही विजयी संघास शाळेचे फिजिकल डायरेक्टर,सुधाकर नीलक, व्हॉलीबॉल संघ व्यवस्थापक सत्तार शेख, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे,संजय इटकर व कन्हैया गंगुले यांचे मार्गदर्शन लाभले.आत्तापर्यंत झालेल्या विविध स्पर्धेत विभागीय पातळीवर हॉकी, बेसबॉल व साੱफ्टबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलने जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मान मिळविला आहे. सदरच्या स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आशुतोष काळे, व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ.चैतालीताई काळे, सहसचिव सौ. स्नेहलताई शिंदे, तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, प्राचार्य नूर शेख,पालक व माजी विद्यार्थी यांनी संघाचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram