जिल्हा परिषद चांदेकसारे गट निवडणूक भाजप शिवसेनेला धोबी पछाड देत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आय पक्षाच्या सोनाली रोहमारे २३४० मतांनी विजयी

आरक्षणाच्या वादात लांबणीवर पडलेली अहमदनगर जिल्हा परिषदेच्या चांदेकसारे गटाच्या निवडणुकीत चांदेकसारे गटातील मतदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य करीत शिवसेना, भाजपच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारून राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आय पक्षाच्या उमेदवार सौ. सोनाली राहुल रोहमारे यांना तब्बल २३४० मतांनी निवडून देत विकासाभिमुख काळे पॅटर्न यशस्वी झाल्याचे दाखवून दिले आहे. कोपरगाव तालुक्यातील अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सुरेगाव, शिंगणापूर, ब्राम्हणगाव व वारी या चार गटाच्या निवडणुकीमध्ये सहा महिन्यापूर्वीच पार पडल्या होत्या. यामध्ये चारही गटात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आय पक्षाचे उमेदवार निवडणून आले आहेत. परंतु चांदेकसारे गटामध्ये ओबीसी महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले होते. या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परंतु न्यायालयाने ओबीसी महिलांसाठी आरक्षण जैसे थे ठेवत निवडणूक जाहीर केली होती. या निवडणुकीत मतदारांनी शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना साफ नाकारत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आय पक्षाच्या सोनाली रोहमारे यांना सर्वाधिक मताधिक्य देत २३४० मतांनी विजयी करीत काळे पॅटर्नवर शिक्कामोर्तब केले आहे. वास्तविक पाहता चांदेकसारे गटाची निवडणूक ही सहा महींन्यापुर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबरोबर होणे अपेक्षित होते. परंतु सत्तेच्या हव्यासापायी ही निवडणूक उशिराने झाली. त्यामुळे साहजिकच जिल्हा परिषदेच्या इतर गटात सुरु असलेली विकास कामे आपल्या गटात निवडणूक लांबल्यामुळे होत नाही हा मतदारांच्या मनातील राग मतदारांनी इव्हीएम मशीनमधून व्यक्त करीत शिवसेना व भाजप उमेदवारांना घरचा रस्ता दाखविला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे, गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, कॉंग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी गटातील प्रत्येक मतदारांपर्यंत जावून पोहोचले होते. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैताली काळे यांनी महिलांची फळी निर्माण करून चांदेकसारे गट पिंजून काढला होता. काही दिवसांपूर्वी पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काळे पॅटर्नने इतिहास घडवत पंचायत समितीची सत्ता काबीज केली होती व जिल्हा परिषदेच्या सुरेगाव, शिंगणापूर, ब्राम्हणगाव व वारी या चार गटात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आय पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. चांदेकसारे गटातील मतदारांनी त्या निकालाची परंपरा कायम ठेवत सोनाली रोहमारे यांना निवडून दिले आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत व गुलालाची उधळन करीत विजयोत्सव साजरा केला. यावेळी पार पडलेल्या सभेत आशुतोष काळे यांनी सर्व मतदारांचे व कार्यर्त्यांचे आभार मानत मतदारांनी दाखविलेला विश्वास या चांदेकसारे गटाच्या सर्वागीण विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत कोपरगाव तालुक्याचा विकास कोण करू शकतो याची जाणीव कोपरगाव तालुक्याच्या जनतेला झाली आहे. कोपरगाव तालुक्याच्या जनतेला आता परिवर्तन हवे असून हा विजय परिवर्तनाची नांदी असल्याचे सांगितले. विजयी उमेदवार सौ. सोनाली राहुल रोहमारे यांनी मतदारांनी सेवा करण्याची दिलेल्या संधीचे सोने करून युवा नेते आशुतोष काळे मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, कॉंग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे,सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, मच्छिंद्र रोहमारे, सचिन रोहमारे, सुनील शिंदे, राहुल रोहमारे, आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram