शिक्षणापासून वंचित असणा-या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार- आशुतोष काळे

माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी शिक्षणाची गंगा शेतक-यांच्या झोपडी पर्यंत नेली. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांचा विशेषत: मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी काही आदिवासी, विविध जाती मातींचे वाड्या वस्त्यांवर राहत आहे. त्यांची मुले आजही शिक्षणापासून दूर असून अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत सर्व शिक्षा अभियान लोकजागृती शिक्षण चित्ररथाचे उदघाटन आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. शिक्षणापासून मुलींची गळती कमी व्हावी, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती वाढवावी, मुलांमध्ये शिक्षणांची गोडी वाढवावी, आरोग्य विषयक जनजागृती करावी, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळावी, तसेच मुलांमधील बौद्धिक, सामाजिक व शैक्षणिक दरी कमी व्हावी आदी उद्देश साध्य करण्यासाठी शिक्षण चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने हा शिक्षण चित्ररथ कोपर्गाव तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर जाणार असुन त्यामुळे शिक्षणापासून वंचित असणा-या मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण होण्यास मदत होणार आहे. या शिक्षण चित्र रथामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणा-या सुविधा आरोग्याची घेतली जाणारी काळजी, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण, स्थलांतरीत होणा-या विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण, मुलगा व मुलगी यांच्यामधील भेदभाव कमी करण्यासाठी संदेश देण्यात आले आहेत. एकप्रकारे शिक्षण किती महत्वाचे याविषयीचे सामजिक प्रबोधन करण्याची महत्वाची जबाबदारी शिक्षण चित्ररथाच्या माध्यमातून पूर्ण होणार असून त्यामुळे शिक्षणापासून वंचित असणारे मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होणार आहे. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसाया होन, उपसभापती अनिल कदम, सदस्य अर्जुन काळे, श्रावण आसने, प्रसाद साबळे, गटविकास अधिकारी वाघिरे, गटशिक्षणाधिकारी शेख मੱडम, नगरसेविका सौ. प्रतिभा शिलेदार, नगरसेवक विरेन बोरावके, राजेंद्र वाकचौरे, मंदार पहाडे, सुनील शिलेदार, संदीप पगारे, अजीज शेख, हिरामण कहार,फकीरमामू कुरेशी, कृष्णा आढाव, जिल्हा उपाध्यक्ष दीपक साळुंके, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र जोशी, अशोक आव्हाटे, रावसाहेब साठे, राजेंद्र बोरावके, मुकुंद इंगळे, रघुनाथ मोरे, बाळासाहेब शिंदे, नितीन बनसोडे, रविंद्र राऊत, हारून शेख, राजेंद्र आभाळे, भरत आढाव, नवाज कुरेशी, प्रसाद आढाव, प्रसाद उदावंत, विकी जोशी, चन्द्रशेखर म्हस्के, निखील डांगे, दिनकर खरे, राहुल देवळालीकर, मनोज कडू, बाला गंगुले, चांदभाई पठाण, वाल्मिक लाहीरे, संतोष टोरपे, नारायण लांडगे, प्रशांत वाबळे, डॉ. चन्द्रशेखर आव्हाड, ऋषिकेश खैरनार, जावेद शेख, प्रकाश दुशिंग, बाळासाहेब पवार, रविंद्र देवरे, सचिन बढे, विशाल निकम, तेजस साबळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram