कोपरगावच्या जनतेची निवड चुकली, आशुतोष काळे उत्तम पर्याय जनतेचा शासनावर विश्वास राहिला नाही, भाजप सेनेला त्यांची औकात दाखवून द्या – -नामदार राधाकृष्ण विखे पाटील

दुष्काळ परिस्थिती असतांना शेतक-यांच्या दुबार तिबार पेरणी करूनही शेतक-यांच्या पदरात काहीही पडणार नाही. संकटाच्या काळात जनतेच्या पाठीमागे उभे राहणे हे शासनाचे काम असते. परंतु शासनाला जनतेच्या प्रश्नाशी काही देणे घेणे नाही त्यामुळे आठ दिवसात ३४ शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून जनतेचा या शासनावर विश्वास राहिलेला नाही. एकमेकांची औकात काढायची व सत्ता भोगायची असा या शासनाचा कारभार चालू असून जिल्हा परिषद चांदेकसारे गटाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ. सोनाली राहुल रोहमारे यांना निवडून देवून या भाजप सेनेच्या शासनाला त्यांची औकात दाखवून द्या असे प्रतिपादन महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोहेगाव येथे जिल्हा परिषद चांदेकसारे गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाच्या सांगता सभेत केले. सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसया होन होत्या. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे, जि. प.सदस्य राजेश परजणे,उमेदवार सौ सोनाली ताई रोहमारे, सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे,सर्व संचालक, राजेंद्र जाधव, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष स्वप्नजा वाबळे, अशोकराव रोहमारे, कारभारी आगवन, मधुकर टेके,राहुल रोहमारे,राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, आनंदराव चव्हाण, एम टी रोहमारे, रोहिदास होन,गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, अनिल महाले, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, उत्तमराव औताडे, दिलीपराव औताडे, मधुकर औताडे, चंद्रकांत औताडे,नानासाहेब औताडे,निवृत्ती शिंदे, सुरेश भालेराव, अविनाश वाके, सौ .शोभा रोहमारे, सौ .मंदा रोहमारे, सौ.रागिणी रोहमारे आदी मान्यवर उपस्थित होते. नामदार विखे पुढे म्हणाले की, शिवसेना भाजपचे सरकार शेतक-यांच्याप्रती प्रामाणिक नाही. बहुमताच्या जोरावर आपण जनतेला मूर्ख बनवू शकतो व सत्ता उपभोगू शकतो असा त्यांचा समज आहे. नऊ हजार शेतक-यांच्या आत्महत्या नंतर ऐतिहासिक कर्जमाफी देत राजा उदार झाला व हाती भोपळा दिला अशा प्रकारची कर्जमाफी या शासनाने शेतक-यांना दिली आहे. आजही मराठवाड्यात शेतक-यांच्या घरात तूर पडून असून समजातील कोणताच घटक समाधानी नाही. जनतेमध्ये सरकारच्या बाबतीत प्रचंड असंतोष असून जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाची सत्ता असून तुम्ही उमेदवार निवडून द्या तुम्हाला निधी कमी पडणार नाही याची जबाबदारी मी घेतो अशी ग्वाही दिली. यावेळी आशुतोष काळे म्हणाले की, ३५ वर्ष सत्ता भोगून उजनी उपसा जलसिंचन योजना न परवडणारी आहे असे सांगून चांदेकसारे गटातील ११ गावातील जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले. ती योजना माजी आमदार अशोकराव यांनी मोठ्या प्रयत्नांनी कार्यान्वित करून २०१४ पर्यंत चालू ठेवली. परंतू २०१४ पासून आजपर्यंत ही उजनी उपसा जलसिंचन योजना वीज बिल थकल्यामुळे बंद आहे. आज निवडणुकीच्या तोंडावर वीजबिल भरून तालुक्याच्या लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करीत असल्याचे सांगत या अकरा गावातील जनतेवर अन्याय होऊ न देता कोपरगावच्या हक्काच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात जावू असा विश्वास दिला. जनतेच्या प्रश्नाबाबत मार्ग काढायचे नाही मात्र शेतकरी संपात फुट शेतक-यांना एकत्र येवू द्यायचे नाही. अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी करीत असल्याचे सांगत कोपरगाव तालुक्याच्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे सांगितले. यावेळी साईनाथ महाराज राहणे, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, जयद्रथ होन, कैलास गव्हाणे, सौ.स्वप्नजा वाबळे,माधवराव खिलारी,राजेंद्र जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बहादरपूर येथील रामनाथ रहाणे, मधुकर पवार, सीताराम राहाणे, शंकर खकाळे, बबन राहाणे, फकीरा राहाणे, जालिंदर राहाणे, विजय पवार, गीतांश पाडेकर, योगेश राहणे, प्रशांत खकाळे, नानासाहेब राहाणे, अशोक राहाणे, दत्तू खकाळे, सतीश पवार, अरुण पाडेकर आदी कार्यकर्त्यांनी शिवसेना भाजप पक्षाला सोडचिट्ठी देत युवानेते आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दीपक साळुंके यांनी केले तर आभार कोपरगाव युवक चे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी मानले. यावेळी चांदेकसारे गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram