गौतम पब्लिक स्कूल व रयत संकुल मध्ये ७१ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

स्वतंत्र भारताचा ७१ वा स्वातंत्र्य दिन कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कूल व रयत शिक्षण संकुलात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्यू. कॉलेज, राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व श्री. छत्रपती संभाजी विद्यालय यांच्या सयुंक्त विद्यमाने रयत संकुलाच्या भव्य मैदानावर प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सौ. पुष्पाताई काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिले त्यांना कधीही बिसरू नका असे सांगत स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे याची जाणीव ठेवा असा महत्वपूर्ण संदेश दिला. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य मते एन. ए., प्राचार्या श्रीमती ज्योती देवरे, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलच्या प्रांगणात सौ. सुशीलामाई काळे कला. वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गौतमनगर व गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट च्या वतीने संस्थेचे विश्वस्त भास्करराव आवारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष छबुराव आव्हाड, माजी उपाध्यक्ष कारभारी जाधव, विश्वस्त सिकंदर पटेल, सदस्य दिलीपराव चांदगुडे प्राचार्य नूर शेख, प्राचार्य सुभाष भारती सर्व शाळा, महाविद्यालयांचे प्राध्यापक-प्राध्यापिका व विद्यार्थी –विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram