कोपरगाव मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दही हंडी उत्साहात संपन्न

कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दही हंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दही हंडी उत्सवामध्ये जय महाकाल ग्रुप, ऑल एकता सोशल फौंडेशन, नगरसेवक संदीप पगारे मित्र मंडळ, गगन हाडा मित्र मंडळ, हिंदू सम्राट तरून मंडळ, माता वैष्णव देवी ग्रुप, नवाज कुरेशी ऑल एकता फौंडेशन, बाला गंगुले मित्र मंडळ, गुरुदत्त युवक संघटना, जय बजरंग तरून मंडळ संजय नगर, हिंदुराज तरून मंडळ, मावला ग्रुप, युवा प्रतिष्ठान गांधी नगर, अक्सा ग्रुप, हनुमान नगर मित्र मंडळ, वीर सम्राट ग्रुप, आर्यन ग्रुप आदी मंडळांच्या युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. दही हंडी फोडण-या मंडळासाठी जवळपास अर्ध्या लाखापेक्षा जास्त रकमेची बक्षीस ठेवण्यात आली होती. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात दही हंडी उत्सवाचा कार्यक्रम पार पडला. अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उंच उंच थर लावून दही हंडी फोडण्याचा प्रयत्न केला परंतू एकाही मंडळाला ही दहीहंडी फोडण्यात यश आले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने विकासाच्या संकल्पना घेवून उभारण्यात आलेली विकासाची दही हंडी युवा नेते आशुतोष काळे यांनी ही दही हंडी फोडली. यशस्वी चार थर लावणा-या बजरंग तरून मंडळाला पाच हजार रुपयांचे बक्षीस युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे प्रदेश सचिव संदीप वर्पे, उपजिल्हाध्यक्ष दीपक साळुंके, शहराध्यक्ष सुनील गंगुले , विजयराव आढाव, नगरसेवक विरेन बोरावके, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, हिरामण कहार, कोपरगाव जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, व्हा. चेअरमन सचिन आव्हाड, जी. प. सदस्य प्रसाद साबळे. दिनार कुदळे, कृष्णा आढाव, डॉ. चन्द्रशेखर आव्हाड, डॉ.तुषार गलांडे, डॉ. दीपक पगारे, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, सुनिल बोरा, अजगर खाटिक, बाळासाहेब रुइकर, विजय चवंडके, राजेंद्र जोशी, दिनकर खरे, दिनेश पवार, अशोक आव्हाटे, इम्तियाज अत्तार, विकास बेद्रे, रावसाहेब साठे, राजेंद्र बोरावके, लक्ष्मन सताळे, मुकुंद इंगळे, प्रशांत वाबळे, सुरेश सोनटक्के, मनोज कडू, रघुनाथ मोरे, बाळासाहेब शिंदे, नितीन बनसोडे, रविंद्र राउत, हारून शेख, राजेंद्र आभाळे, भरत आढाव, नवाज कुरेशी, प्रसाद आढाव, तुषार सरोदे, शिवा लकारे, मच्छिंद्र सोनवणे, विजय नागरे, संदीप सावतडकर, जनार्दन शिंदे, रंगनाथ टिळेकर, निलेश रुईकर, प्रसाद उदावंत, मनोज गायकवाड, शपीक शेख,किशोर वाघ, विकी जोशी, चन्द्रशेखर म्हस्के, निखील डांगे, रमेश गवळी, राहुल देवळालीकर, बाला गंगुले, गोरख पंडोरे, कुलदीप लवांडे, गणेश लकारे, धनंजय लकारे, योगेश जगताप, चांदभाई पठान, वाल्मिक लाहीरे, संतोष टोरपे, संजय बचाटे, नारायण लांडगे,बिलालभाई पठान, शिवराम निकम, सतीश शिंदे, रसीद शेख, जावेद शेख, अशोक लांडगे, रहेमान कुरेशी, सचिन परदेशी, कैलास मंजुळ, प्रकाश जोशी, संकेत कडवे, महेश उगले, सचिन बढे, विशाल निकम, भावेश थोरात, रविंद्र आहेर, स्वप्नील पवार, तेजस साबळे, साईनाथ लांडगे, सचिन पगारे, रवी हारळे, कार्तिक सरदार, गौतम खंडीझोड, आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram