कामगार सेवेतून निवृत्त परंतू उद्योग समूहाच्या ऋणानुबंधनातून कधीही निवृत्त होणार नाही - आशुतोष काळे

माजी खासदार स्व.शंकररावजी काळे साहेबांनी नेहमीच सभासद व कामगारांना केंद्र स्थानी ठेवून त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. माजी आमदार अशोकदादा काळे यांनी स्व. साहेबांची परंपरा जोपासली. त्यांनी कामगारांच्या सुखदुख:त सहभागी होऊन कामगारांच्या अडचणी सोडविन्याला नेहमी प्राधान्य दिले. त्यांच्याच विचारांचा वसा व वारसा जोपासत असतांना मलाही प्रेम व सहकार्य मिळाले. हे माझे भाग्य असून आज कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहातून निवृत्त होणारे कर्मचारी जरी शासन नियमाप्रमाणे निवृत्त होत असतील परंतू कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाच्या ऋणानुबंधनातून कधीही निवृत्त होऊ शकणार नाही असे प्रतिपादन कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ३१ व आसवनी विभागाच्या १२ अशा एकून ४३ कामगारांच्या सपत्नीक सेवा निवृत्ती कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय.... अधिक माहितीसाठी

आशुतोष काळे यांचा वाढदिवस वृक्षारोपण, रक्तदान शिबीर आदी सामाजिक उपक्रम राबवून साजरा

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांचा वाढदिवस वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, विद्यार्थ्यांची रक्त गट तपासणी अशा प्रकारे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. मागील वर्षी कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे आशुतोष काळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त साजरे करण्यात येणारे सर्व कार्यक्रम रद्द करून कोपरगाव शहरात पुराच्या पाण्याने रोगराई निर्माण होऊ नये यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. त्यांच्या सामाजिक विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच, कर्मवीर प्रतिष्ठाण, आशुतोष दादा रयत विचार मंच, प्रेरणा फौंडेशन, बजरंग चौक मित्रमंडळ तसेच आशुतोष दादा फौंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये कारखाना कार्यस्थळावरील रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलातील श्री. छत्रपती संभाजी विद्यालयातील एकून एक हजार चारशे विद्यार्थी.... अधिक माहितीसाठी

आशुतोष काळे यांचे भविष्य उज्वल – नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यांनतर मला नूतन नगरसेवकांचे सहकार्य मिळेल का नाही आणी मिळालेच तर ते सहकार्य कशा प्रकारचे असेल अशी मनात साशंकता असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी सर्वप्रथम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने विकास कामांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे व जाहीर पाठिंबा दिला त्याचवेळी मला आशुतोष काळे हे विकासाच्या बाबतीत कधीही कुठेही राजकारण करणारे व्यक्तिमत्व नसून विकासकामांना सकारात्मक प्रतिसाद देणारे नेतृत्व असल्याचे मी मनोमन जाणले. त्यांची सुरु असलेली वाटचाल योग्य असून आशुतोष काळे यांचे भविष्य उज्वल असल्याचे गौरवोदगार कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी कोपरगाव येथे आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम प्रसंगी केले. कोपरगाव येथे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांना वाढदिवसाच्या.... अधिक माहितीसाठी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या योजनांचा फायदा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणार – आशुतोष काळे

जिल्हा परिषद व पंचायत समिती हे ग्रामीण भागाच्या विकासाचे प्रमुख केंद्र स्थान आहे.आजवर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या योजनांचा फायदा समाजातील मोजक्याच व्यक्तींना मिळत होता. योजनांचा लाभ हा शेवटच्या घटकांपर्यंत कधीच पोहोचलाच नाही. परंतु आता यापुढे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ज्या काही योजना असतील त्या प्रत्येक योजनांचा लाभ हा त्या योजनेच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणार असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कडबा कुट्टी मशीन व इलेक्ट्रिक मोटार, पाईप व साहित्याचे वाटप प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात.त्या योजनांच्या माध्यमातून अनुसूचित जाती,जमातीच्या दारिद्र्य रेषेखालील शेतकरी कुटुंबांना कडबा कुट्टी मशीन व इलेक्ट्रिक मोटार १०० टक्के अनुदानातून दिल्या जातात. समाज कल्याण.... अधिक माहितीसाठी

दुटप्पी भूमिका घेणा-यांना त्यांची जागा दाखवून द्या - आशुतोष काळे | चांदेकसारे जि.प. गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार प्रचार शुभारंभ

कोपरगाव तालुक्यातील देर्डे – को-हाळे, पोहेगाव खु. चांदेकसारे, डाऊच खु., कोकमठाण, कान्हेगाव, भोजडे, धोत्रे, संवत्सर, घारी, जेऊर कुंभारी आदी गावातील शेतक-यांवर व नागरिकांवर समृद्धी महामार्गाचे संकट आले त्यावेळी या गावातील शेतक-यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलो. शेतक-यांच्या जमिनी समृद्धी महामार्गाच्या संकटातून सोडविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे शासनाने स्मार्ट सिटी दुसरीकडे नेली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागातील शेतक-यांच्या जमिनी वाचल्या. मी यापुढेही शेतक-यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे परंतू समृद्धी महामार्गाच्या बाबतीत शेतक-यांसोबत असल्याचे खोटे बोलायचे व सरकारच्या बैठकीत सरकारच्या बाजूने बोलायचे, अशी दुटप्पी भूमिका समृद्धी महामार्गाच्या बाबतीत घेतली तीच भूमिका शेतकरी संपामध्ये घेतली. अशा दुटप्पी भूमिका घेणा-यांना त्यांची जागा दाखवून द्या असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी.... अधिक माहितीसाठी

कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी संपर्क कार्यालय – आशुतोष काळे

कोपरगाव विधान सभा मतदार संघामध्ये राहाता तालुक्यातील ११ गावे नव्याने समाविष्ट करण्यात आली. त्यावेळी या ११ गावातील जनतेने माजी आमदार अशोकराव काळे यांना भरघोस मतांनी निवडून दिले. या ऋणातून उतराई होण्यासाठी आमदार अशोकराव काळे यांनी या ११ गावांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देवून जास्तीत जास्त विकास कामे केली. परंतु केलेल्या विकास कामांची कधीही जाहिरात केली नाही. आज कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीं फक्त स्थानिक विकास निधीतून हायमੱक्स व स्मशान भूमीचे शेड यापलीकडे कोणतेही कामे करीत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे समस्या वाढल्या आहेत. नागरिकांचे ज्वलंत प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी संपर्क कार्यालय स्थापन केले असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी राहाता संपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी केले. शिर्डी, राहाता.... अधिक माहितीसाठी

कोपरगाव मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दही हंडी उत्साहात संपन्न

कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दही हंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दही हंडी उत्सवामध्ये जय महाकाल ग्रुप, ऑल एकता सोशल फौंडेशन, नगरसेवक संदीप पगारे मित्र मंडळ, गगन हाडा मित्र मंडळ, हिंदू सम्राट तरून मंडळ, माता वैष्णव देवी ग्रुप, नवाज कुरेशी ऑल एकता फौंडेशन, बाला गंगुले मित्र मंडळ, गुरुदत्त युवक संघटना, जय बजरंग तरून मंडळ संजय नगर, हिंदुराज तरून मंडळ, मावला ग्रुप, युवा प्रतिष्ठान गांधी नगर, अक्सा ग्रुप, हनुमान नगर मित्र मंडळ, वीर सम्राट ग्रुप, आर्यन ग्रुप आदी मंडळांच्या युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. दही हंडी फोडण-या मंडळासाठी जवळपास अर्ध्या लाखापेक्षा जास्त रकमेची बक्षीस ठेवण्यात आली होती. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात दही हंडी उत्सवाचा कार्यक्रम पार पडला. अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उंच उंच थर लावून दही हंडी फोडण्याचा प्रयत्न केला परंतू एकाही मंडळाला ही दहीहंडी.... अधिक माहितीसाठी

गौतम पब्लिक स्कूल व रयत संकुल मध्ये ७१ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

स्वतंत्र भारताचा ७१ वा स्वातंत्र्य दिन कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कूल व रयत शिक्षण संकुलात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्यू. कॉलेज, राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व श्री. छत्रपती संभाजी विद्यालय यांच्या सयुंक्त विद्यमाने रयत संकुलाच्या भव्य मैदानावर प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सौ. पुष्पाताई काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिले त्यांना कधीही बिसरू नका असे सांगत स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे याची जाणीव ठेवा असा महत्वपूर्ण संदेश दिला. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य मते एन. ए., प्राचार्या श्रीमती ज्योती देवरे, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन.... अधिक माहितीसाठी

कोपरगावच्या जनतेची निवड चुकली, आशुतोष काळे उत्तम पर्याय जनतेचा शासनावर विश्वास राहिला नाही, भाजप सेनेला त्यांची औकात दाखवून द्या – -नामदार राधाकृष्ण विखे पाटील

दुष्काळ परिस्थिती असतांना शेतक-यांच्या दुबार तिबार पेरणी करूनही शेतक-यांच्या पदरात काहीही पडणार नाही. संकटाच्या काळात जनतेच्या पाठीमागे उभे राहणे हे शासनाचे काम असते. परंतु शासनाला जनतेच्या प्रश्नाशी काही देणे घेणे नाही त्यामुळे आठ दिवसात ३४ शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून जनतेचा या शासनावर विश्वास राहिलेला नाही. एकमेकांची औकात काढायची व सत्ता भोगायची असा या शासनाचा कारभार चालू असून जिल्हा परिषद चांदेकसारे गटाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ. सोनाली राहुल रोहमारे यांना निवडून देवून या भाजप सेनेच्या शासनाला त्यांची औकात दाखवून द्या असे प्रतिपादन महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोहेगाव येथे जिल्हा परिषद चांदेकसारे गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाच्या सांगता सभेत केले. सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसया होन होत्या. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष.... अधिक माहितीसाठी

शिक्षणापासून वंचित असणा-या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार- आशुतोष काळे

माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी शिक्षणाची गंगा शेतक-यांच्या झोपडी पर्यंत नेली. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांचा विशेषत: मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी काही आदिवासी, विविध जाती मातींचे वाड्या वस्त्यांवर राहत आहे. त्यांची मुले आजही शिक्षणापासून दूर असून अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत सर्व शिक्षा अभियान लोकजागृती शिक्षण चित्ररथाचे उदघाटन आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. शिक्षणापासून मुलींची गळती कमी व्हावी, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती वाढवावी, मुलांमध्ये शिक्षणांची गोडी वाढवावी, आरोग्य विषयक जनजागृती करावी, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळावी, तसेच मुलांमधील बौद्धिक, सामाजिक व शैक्षणिक दरी कमी व्हावी आदी उद्देश साध्य करण्यासाठी शिक्षण चित्ररथाची.... अधिक माहितीसाठी

जिल्हा परिषद चांदेकसारे गट निवडणूक भाजप शिवसेनेला धोबी पछाड देत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आय पक्षाच्या सोनाली रोहमारे २३४० मतांनी विजयी

आरक्षणाच्या वादात लांबणीवर पडलेली अहमदनगर जिल्हा परिषदेच्या चांदेकसारे गटाच्या निवडणुकीत चांदेकसारे गटातील मतदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य करीत शिवसेना, भाजपच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारून राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आय पक्षाच्या उमेदवार सौ. सोनाली राहुल रोहमारे यांना तब्बल २३४० मतांनी निवडून देत विकासाभिमुख काळे पॅटर्न यशस्वी झाल्याचे दाखवून दिले आहे. कोपरगाव तालुक्यातील अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सुरेगाव, शिंगणापूर, ब्राम्हणगाव व वारी या चार गटाच्या निवडणुकीमध्ये सहा महिन्यापूर्वीच पार पडल्या होत्या. यामध्ये चारही गटात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आय पक्षाचे उमेदवार निवडणून आले आहेत. परंतु चांदेकसारे गटामध्ये ओबीसी महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले होते. या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परंतु न्यायालयाने ओबीसी महिलांसाठी आरक्षण जैसे थे ठेवत निवडणूक जाहीर केली होती. या निवडणुकीत मतदारांनी शिवसेना-भाजपच्या.... अधिक माहितीसाठी

माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण व रक्तदान शिबीर कार्यक्रम संपन्न

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व अर्पण रक्त पेढी संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उदघाटन संस्थेच्या मानद सचिव सौ. चैताली काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये एकून ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी सौ. चैताली काळे यांनी रक्तदानाचे महत्व विषद करतांना त्या म्हणाल्या की, आपल्या संस्कृतीमध्ये दान करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. वेळप्रसंगी मानवाला आवश्यक असणा-या रक्ताची गरज फक्त आणि फक्त मानवच पूर्ण करू शकतो. आपण केलेल्या रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते याची जाणीव ठेवून युवकांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला पाहिजे. तसेच आजचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग असून युवा वर्गाने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात.... अधिक माहितीसाठी

जिल्हा नियोजन समितीवरही काळे पॅटर्न यशस्वी ३२ पैकी ४ सदस्य कोपरगाव तालुक्यातील

आशुतोष काळे यांनी आपले राजकीय कौशल्य वापरून समविचारी कॉंग्रेस पक्षाशी आघाडी करीत कोपरगाव तालुक्यात इतिहास घडवून पंचायत समितीची एकहाती सत्ता मिळवत जिल्हा परिषदेच्या चारही गटात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून चारही गटात विजय मिळविला होता. या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत काही दिवसापूर्वी अहमदनगर येथे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना एका कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांचे कौतुक करून यापुढे अहमदनगर जिल्ह्याने काळे पॅटर्न वापरावा असे सुतोवाच केले होते. त्यांनी केलेले सुतोवाच अतिशय सार्थ असल्याचे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत दिसून आले आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या एकून १३ तालुक्यातून निवडण्यात आलेल्या ३२ सदस्यांपैकी तब्बल चार सदस्य हे एकट्या कोपरगाव तालुक्यातील असून कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात अशी किमया आजपर्यंत कुणाला जमली नाही,.... अधिक माहितीसाठी

गौतम सहकारी बँकेस जिल्हा सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुरस्कार प्रदान

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने विविध स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमात सर्वाधिक प्रशिक्षणार्थी सहभागी केल्याबदल कोपरगाव तालुक्यातील गौतम सहकारी बँकेस पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांमध्ये विशेष सहकार्य व उल्लेखनीय योगदान देणा-या सहकारी बँकेला विशेष पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यावर्षी गौतम सहकारी बँकेला अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने प्रशिक्षण कार्यक्रमात सर्वाधिक प्रशिक्षणार्थी सहभागी केल्याबदल पुरस्कार व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार नुकताच गौतम सहकारी बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते यांना बँक बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र लोहाडे यांच्या हस्ते व उपाध्यक्ष नाथा राऊत व कार्यलक्षी संचालक अशोक कुरापटी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. स्व. माजी खासदार शंकररावजी काळे यांनी ग्रामीण भागातील तसेच.... अधिक माहितीसाठी

शासकीय इमारतींच्या सद्य स्थितीचा तातडीने आढावा घ्या आशुतोष काळे यांच्या सूचना

निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाचवीच्या वर्गाचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेतील काही विद्यार्थी मृत्यूशी झुंज देत आहे तर काही विद्यार्थ्यांना अपंगत्व आले आहे. अशा घटनांची कोपरगाव तालुक्यात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोपरगाव तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत येणा-या सर्व इमारतींचा आढावा घेवून एकत्रित अहवाल सादर करावा अशा सूचना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यानी पंचायत समितीला दिल्या आहेत. कोपरगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रत्येक गावात शासकीय इमारती आहेत. यामध्ये जिल्हा परिषद शाळा इमारतीच्या खोल्या, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु वैद्यकीय दवाखाना, सरकारी कर्मचा-यांची निवासस्थाने, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व इमारती, आदी शासकीय इमारतींची पाहणी करून या सर्व इमारतींचा एकत्रित अहवाल सादर करावा. यामध्ये पत्येक शासकीय इमारतीचे.... अधिक माहितीसाठी

गणेशोत्सवा निमित्त कर्मवीर काळे कारखान्यावर सत्यनारायण महापूजा संपन्न

कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर याहीवर्षी गणेशोत्सव मोठा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवा निमित्त शुक्रवार दिनांक १/९/२०१७ रोजी कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. चैतालीताई काळे यांच्या शुभ हस्ते श्री. सत्यनारायण महापूजा पार पडली. कारखान्याचे चीफ इंजिनिअर दौलतराव चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. चंद्रकला चव्हाण यांच्या शुभहस्ते ‘श्री गणेशाची’ स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सव उपसमितीच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमासाठी परिसर व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. श्री. सत्यनारायण महापूजा कार्यक्रमासाठी कारखान्याचे व्हा. चेअरमन सूर्यभान कोळपे, संचालक सुनील शिंदे, राजेंद्र मेहेरखांब, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर जयंतराव भिडे, कारखान्याचे जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे, सेक्रेटरी.... अधिक माहितीसाठी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी योजने अंतर्गत शेतक-यांना विहिरींसाठी आर्थिक अनुदान – आशुतोष काळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतक-यांनी विहिरीसाठी आर्थिक अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा कोपरगाव तालुक्यातील अनुसूचित जाती, व नवबौद्ध गरजू शेतक-यांनी लाभ घ्यावा असे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषद अहमदनगर यांचेवतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंर्तगत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतक-यांना विहिरींसाठी आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे.या योजने अंतर्गत प्रथम २० विहिरींचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहेत. या योजनेचा आर्थिक लाभ घेण्यासाठी शेतक-यांना काही निकषांची पूर्तता करावी लागणार आहे. यामध्ये लाभधारक शेतक-याकडे अनुसूचित जाती व नवबौद्ध असल्याबाबतचा जातीचा सक्षम प्राधिका-याचे जात प्रमाणपत्र, ८ अ/ ७/१२ उतारे (८ अ स्वतंत्र नावाने आवश्यक), शेतक-यांच्या स्वताच्या नावे किमान ०.४० हेक्टर व कमाल ६.०० हेक्टर जमीन असावी, लाभार्थ्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे, लाभार्थ्याचे.... अधिक माहितीसाठी

विजयाची परंपरा कायम ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे - आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्यात सर्वत्र विकासाच्या नावाने बोंबाबोंब सुरु आहे. सध्या आश्वासने देवून जनतेला नादी लावण्याचे काम सुरु असून या आश्वासनाला कोपरगाव तालुक्याची जनता वैतागली आहे. विकासाचे प्रश्न फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच सोडवू शकतो अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावरचा विश्वास अधिक दृढ होत चालला आहे. त्या विश्वासाच्या आधारावरच पंचायत समिती व जिल्हा परिषद तसेच नुकत्याच पार पडलेल्या चांदेकसारे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला निर्भेळ यश मिळाले आहे. या यशाची परंपरा यापुढेही कायम ठेवण्यासाठी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आघाडी सेल तालुका अध्यक्ष निवडी प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन प्रसंगी करून.... अधिक माहितीसाठी

विकासाचा अॅक्शन प्लॅन तयार करा - आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी गावाच्या विकासाचा अॅक्शण प्लॅन तयार करा यामध्ये प्रथम पिण्याचे पाणी, त्यांनतर शौचालय व स्वच्छता व त्यांनंतर रस्ते व मुलभूत सुविधांना प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या विविध विभागाच्या आढावा बैठकीत केले. यावेळी आरोग्य विभागातील कर्मचा-यांना विशेष सूचना देतांना नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे हे लक्षात ठेवून आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी काम करावे वेळप्रसंगी कामाचे तास वाढवावे. कामचुकारपणा करणा-या कर्मचा-यांची गय केली जाणार नाही असा सज्जड इशाराच या आढावा बैठकीत त्यांनी आरोग्य कर्मचा-यांना दिला. पंचायत समितीच्या विविध विभागाची आढावा बैठक नुकतीच पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजलि वाहण्यात आली. युवा नेते आशुतोष काळे पुढे म्हणाले की, आरोग्य.... अधिक माहितीसाठी

शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलकडे तालुक्याचे नेतृत्व

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा संकुल कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या तालुकास्तरीय मुलींच्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलने सलग तिस-यांदा कोपरगाव तालुक्याचे जिल्हा स्तरावर नेतृत्व करण्याचा मान पटकाविला आहे. या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींच्या १४ व १७ वर्षे वयोगटातील दोन्ही संघ आत्मा मलिक क्रीडा संकुल कोकमठाण येथे होणा-या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. गौतम पब्लिक स्कूलच्या १४ वर्षाखालील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने शारदा इंग्लिश मेडियम स्कूल व आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल यांचा सहज पराभव करून स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संजीवनी इंग्लिश मेडियम स्कूलवर १५-३ व १५-५ असा दोन सरळ सेट मध्ये दणदणीत विजय मिळविला तर १७ वर्ष वयोगटात आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल व संजीवनी इंग्लिश मेडियम स्कूलवर १५-९ व १५-११.... अधिक माहितीसाठी

गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना एल. आय. सी. तर्फे स्टुडंट ऑफ द इयर २०१७ पुरस्कार

भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा कोपरगाव यांचेवतीने कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलच्या दहा विद्यार्थ्यांना स्टुडंट ऑफ द इयर २०१७ पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा कोपरगाव यांचे वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय अभ्यास, संगीत, क्रीडा व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात येते. मागील वर्षी महर्षी विद्या मंदिर कोपरगाव या विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. यावर्षी गौतम पब्लिक स्कूलमधील शुभम मोरे, संकेत नळे, निखील खैरनार, रोहित पानगव्हाणे, कौस्तुभ गोसावी, विवेक बिडवे,प्रतिक भागवत,कु. विद्या शिंदे, कु. साक्षी गुलदगड, कु. ऋतुजा घुमरे या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना स्टुडंट ऑफ द इयर २०१७ पुरस्काराने सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांचे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे,.... अधिक माहितीसाठी

जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचे दोन संघ राज्य पातळीवर

दिनांक १३ व १४ सप्टेबर रोजी जिल्हाक्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या नेहरू हॉकी स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलच्या १५ व १७ वर्षे वयोगटात दोन्ही संघानी विजेतेपद पटकाविले. असून राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धा दिनांक २० सप्टेबर रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या १५ वर्षे वयोगटात हॉकीच्या अंतिम सामन्यात सेंट जोसेफ स्कूल, पुणे शहर या संघावर ३-१ अशा गोल फरकाने तर १७ वर्ष वयोगटात पिंपरी चिंचवड संघावर १-0 गोलने विजय मिळवीत राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेत पुणे विभागाची नेतृत्व करण्याची परंपरा कायम राखली आहे अशी माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. अंतिम सामन्यात १५ वर्षे वयोगटातील संघाकडून तेजस बोरसे, ओम बडवर(दोन गोल) व अजय गायके यांनी गोल नोंदविले.तर प्रतिक खडसे याने अप्रतिम.... अधिक माहितीसाठी

स्व. शंकररावजी काळे यांनी समाजातील प्रत्येक घटकांचा विचार केला – आशुतोष काळे

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा डोलारा सांभाळत असतांना शिक्षण महर्षी माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी फक्त कारखान्याचे हित न बघता कारखानाच नव्हे तर पंचक्रोशीतील प्रत्येक घटकांचा विचार करून प्रत्येकाला काही ना काही उद्योग व्यवसाय करण्याची संधी निर्माण करून दिली. त्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून समजातील या घटकांचा त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी मदत कशी होईल हाच विचार स्व. साहेबांनी आपल्या संपूर्ण जीवनात केला. १८० सभासद व १४४ करार धारक ट्रकला वाहतुकीचा धंदा गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी मार्फत देण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच ट्रक धारक व चालक यांच्या आर्थिक गरजा पूर्ण झाल्या आहेत. संस्था सभासदांच्या संकटकाळी वेळोवेळी धावून जाते. त्या माध्यमातून ट्रक ड्रायव्हर साबळे यांचे अपघाती निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना कंपनीने रुपये एक लाख सानुग्रह अनुदान दिले असून स्व. साहेबांच्या निस्वार्थी विचारातूनच गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट.... अधिक माहितीसाठी

भारनियमन असतांना पाणी पुरवठा करू नका कोपरगाव शहर राष्ट्रवादीची कोपरगाव नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे मागणी

राज्यात मागील काही दिवसांपासून अचानक विजेचे भारनियमन वाढले असून कोपरगाव शहरातही सकाळ व दुपारच्या सत्रात भारनियमन होत आहे व याच वेळी पाणी पुरवठा केला जातो. भारनियमन सुरु असल्यामुळे कोपरगावच्या नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे विजेचे भारनियमन सुरु असतांना कोपरगाव शहरात पाणी पुरवठा करू नये अशा आशयाचे निवेदन युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले व गटनेते विरेन बोरावके यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना दिले आहे. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील नागरिकांना पावसाळा सुरु असूनही चार ते पाच दिवसांनी नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो.त्यामुळे साहजिकच दैनदिन वापरासाठी आवश्यक असणारे पाणी पाच दिवस पुरेल एवढे मिळणे आवश्यक आहे. परंतु ऐन भारनियमनाच्या काळात पाणी पुरवठा केला जातो व त्यामुळे मोठया प्रमाणात पाणी पट्टी व घरपट्टी भरूनही पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. श्रीरामपूर.... अधिक माहितीसाठी

विभागीय पातळीवर व्हॉलीबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलकडे जिल्ह्याचे नेतृत्व

जिल्हास्तरीय क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धा २० संप्टेंबर आत्मा मलिक क्रीडा संकुलात रोजी पार पडल्या. या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलने सलग तिस-यांदा विभागीय पातळीवर अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मान पटकाविला आहे.सदर स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या १४ व १७ वर्ष वयोगटातील दोन्ही संघ विभागीय पातळीवर अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. पब्लिक स्कूलच्या १४ वर्ष वयोगटातील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने राहुरी व श्रीरामपूर संघावर सहज विजय मिळवीत अंतिम सामन्यात राहाता संघावर १६-१४, १५-१० असा दणदणीत विजय मिळविला. १७ वर्ष वयोगटातील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने पाथर्डी व नेवासा या संघावर मात करून अंतिम सामन्यात संगमनेर संघावर १२-१५, १५-७ व १५-११ ने विजय मिळवून स्पर्धेत वर्चस्व कायम राखले. १४ वर्ष वयोगटातील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाकडून कर्णधार सायली निकम, साक्षी.... अधिक माहितीसाठी

आव्हानात्मक परिस्थितीत गौतम सहकारी बँकेची नेत्रदीपक कामगिरी – आशुतोष काळे | शरदराव पवार पतसंस्थेच्या सभासदांना याहीवर्षी १५ टक्के लाभांश

माजी खासदार स्व. शंकररावजी काळे साहेबांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवर व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संस्था प्रगतीपथावर आहेत. मागील आर्थिक वर्ष हे अतिशय आव्हानात्मक वर्ष होते. परंतु अशा आव्हानात्मक परिस्थितीतही गौतम सहकारी बँकेने नेत्रदीपक कामगिरी केल्याचे गौरवदगार काढत शरदराव पवार पतसंस्थेच्या सभासदांना याहीवर्षी १५ टक्के लाभांश देणार असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यानी केले. गौतम सहकारी बँक व शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्था व गौतम सहकारी कुक्कुटपालन या संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात कर्मवीर शंकरराव काळे सभागृहामध्ये माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी संथेचे जेष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने, सुनील शिंदे, अशोकमामा काळे, गौतम.... अधिक माहितीसाठी

स्व. शंकररावजी काळे साहेबांनी फक्त रयत शिक्षण संस्थेलाच मोठं केलं – सरपंच पोपटराव पवार

स्वत:च्या गावात निवडून येणे अवघड होऊन बसले असतांना स्व. माजी खासदार शंकररावजी काळे साहेब कोपरगाव तालुक्यात राहून पारनेर तालुक्यातून निवडून आले यावरून त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य किती महान आहे याची कल्पना येते. स्व. साहेबांनी मनात आणले असते तर अहमदनगर जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांच मोठं नेटवर्क उभं करू शकले असते पण साहेबांनी फक्त आणि फक्त रयत शिक्षण संस्थेलाच मोठं केलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी केलेलं कार्य अनमोल असून स्व. शंकररावजी काळे साहेब दुसरे कर्मवीर आहे असे प्रतिपादन आदर्श गाव हिवरे बाजार चे सरपंच पोपटराव पवार यांनी काढले. कोपरगाव तालुक्यातील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामांदीर व कनिष्ट महाविद्यालय तसेच श्री. छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय सुरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोळपेवाडी येथील रयत संकुलात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक व थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील.... अधिक माहितीसाठी

राष्ट्रीय नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

दिनांक २० व २१ सप्टेंबर २०१७ रोजी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय पुणे आयोजित राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे नुकत्याच पार पडल्या.सदर स्पर्धेत कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलच्या १५ वर्ष वयोगटातील संघाने विजेतेपद पटकाविले असून हा संघ दिल्ली येथे होणा-या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये दिनांक ८ ऑक्टोंबर पासून सहभागी होणार आहे. हा संघ राष्ट्रीय सब-ज्युनिअर जवाहरलाल नेहरू स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. गौतम पब्लिक स्कूलच्या १५ वर्ष वयोगटातील संघाने औरंगाबाद व मुंबई विभागावर एकतर्फी विजय मिळवून अंतिम सामन्यात कोल्हापूर विभागावर ३-१ अशा गोल फरकाने दणदणीत विजय मिळवून राष्ट्रीय नेहरू हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची परंपरा कायम राखली आहे. अंतिम सामन्यात १५ वर्षे वयोगटातील संघाकडून तेजस बोरसे, ओम बडवर, व शुभम मोरे यांनी गोल नोंदविले..... अधिक माहितीसाठी

नवरात्रोत्सव निमित्त आयोजित जागर स्त्री शक्तीच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या प्रेरणेतून कोपरगाव येथे नवरात्रोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जागर स्त्रि शक्ती कार्यक्रमाला कोपरगाव शहरासह तालुक्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोपरगाव शहरात सालाबाद प्रमाणे याहीवर्षी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक २१/९/२०१७ पासून जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने कोफ्त कोपरगाव येथे प्रशिक्षण शिबीर ठेवण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरात मोठया संख्येने युवती व महिलांनी सहभाग घेतला होता. जागर स्त्री शक्तीच्या कार्यक्रमासाठी महिला नियमित मोठ्या संख्येने उपस्थित राहून आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा व कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. दररोज दुपारी १२. ते २.०० या वेळेत दुर्गा सप्तश्रुतीचे पाठ पठण.... अधिक माहितीसाठी

वेस –सोयेगाव च्या युतीच्या सरपंच सौ. मनीषा गोसावी समर्थकांसह राष्ट्रवादीत दाखल

कोपरगाव तालुक्यातीलवेस–सोयेगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या शिवसेना भाजपा युतीच्या विद्यमान सरपंच सौ. मनीषा भीमराज गोसावी यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी भीमराज विठ्ठल गोसावी व शंकर हरीगीर गोसावी यांचा व समर्थकांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी किसन पाडेकर, कौसर सय्यद, सिकंदर इनामदार, आप्पा शेंडगे, दिलीप जुंधारे, भागवत खंडीझोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कोपरगाव तालुक्यातील एकून २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून यामध्ये वेस ग्रामपंचायतीचीही निवडणूक होत आहे. युवा नेते आशुतोष काळे यांच्याकडे कोपरगाव तालुक्याच्या विकासाची दूरदृष्टी आहे. त्यांच्या माध्यमातून वेस गावाचे विकासाचे अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे विद्यमान सरपंच सौ. मनीषा भीमराज गोसावी यांनी म्हटले असून राष्ट्रवादी.... अधिक माहितीसाठी

कर्मवीर काळे कारखान्याच्या सभासदांची व कामगारांची दिवाळी गोड कारखान्याचा ६३ बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम संपन्न

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना व कामगारांना दिवाळी सण गोड व्हावा यासाठी सन २०१६-१७ च्या उस गळीतास शेततळे अनुदान प्र.मे.टन १०० रुपये ठिबक सिंचन प्र.मे.टन १०० रुपये तसेच ऊस पुरवठा विशेष अनुदानाच्या स्वरूपात प्र.मे.टन १०० रुपये असा दर देवून व कामगारांना कारखान्याच्या अतिशय कठीण परीस्थितही १० अधिक एक असा ११ टक्के बोनस व हंगामी कर्मचा-यांना रिटेन्शन व त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार १५ टक्के पगारवाढ फरकाची उर्वरित राहिलेल्या ५० टक्के रक्कमेपैकी निम्मी रक्कम याप्रमाणे पगारवाढ फरकाची ७५ टक्के रक्कम कामगारांना देवून सभासद व कामगारांची दिवाळी गोड केली असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६३ व्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. कारखान्याच्या सन २०१७-१८ या वर्षाच्या ६३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे.... अधिक माहितीसाठी

तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी तोंड वाजवीत बसण्यापेक्षा काम दाखवावे – आशुतोष काळे

या कोपरगाव तालुक्याच्या जनतेने तुमच्याकडे पंचायत समिती ठेवली नाही, कोपरगावचे नगराध्यक्षपद तुमच्याकडे ठेवले नाही , तुमचा एक जिल्हा परिषद सदस्य सुद्धा निवडून दिला नाही याची जान ठेवा. अल्पशा यशाने हुरळून जावू नका.नुसते तोंड वाजवीत बसण्यापेक्षा विकास करून दाखवा असे सडेतोड आव्हान कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना केले. जनसुविधा योजने अंतर्गत १५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कुंभारीच्या नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उदघाटन युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती सौ. अनुसया होन होत्या. ते पुढे म्हणाले की, विकासाच्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो. आम्ही एकत्र आल्याचे कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आवडले असल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये अभूतपूर्व यश मिळाले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या.... अधिक माहितीसाठी

युवा नेते आशुतोष काळे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम एक्सलन्स राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सिटीझन्स इंटेग्रेशन पीस इन्स्टिट्यूट नवी दिल्ली यांचे वतीने उद्योग व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-या व्यक्तींना देशाचे दिवंगत राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या नावे दिला जाणारा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम एक्सलन्स राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी आशिया खंडात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणा-या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांना नुकताच नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅसेंटर सेमिनार हॉल येथे देशाचे माजी गृहराज्य मंत्री व पंजाबचे माजी राज्यपाल शिवाजीराव पाटील चाकूरकर यांच्या हस्ते मॉरीशसचे भारतीय राजदूत जे गोवर्धन, माजी राज्यपाल व केंद्रीय मंत्री डॉ. भीष्म नारायण सिंग व नेपाळचे भारतीय राजदूत दिपकुमार उपाध्यय आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच प्रदान करण्यात आला. आपल्या देशाची सर्वागीण प्रगती व्हावी. युवकांचा देशाच्या प्रगतीमध्ये जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी सिटीझन्स इंटेग्रेशन पीस इन्स्टिट्यूट नवी दिल्ली हि संस्था काम करते.या.... अधिक माहितीसाठी

आशुतोष काळे यांची दि डीस्टीलर्स असोसिएशन च्या उपाध्यक्षपदी निवड

आशिया खंडातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणा-या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांची नुकतीच दि डीस्टीलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. दि डीस्टीलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र,मुबई ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अकलूज येथे पार पडली. अतिशय कमी वयात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळून कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे कारखान्याला वेगाने प्रगतीच्या दिशेने घेवून जात आहे, त्यांच्या कार्याची दखल घेवून अकलूज येथे पार पडलेल्या या सभेत एकमताने त्यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर अध्यक्षपदी श्री. विजयसिंह मोहिते पाटील यांची व खाजगी डीस्टीलरीचे श्री. कनु कलांनी यांचीही उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अमेरिकेत राहून उच्च शिक्षण घेवूनही समाजकारणाचा वसा जोपासत स्व. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर.... अधिक माहितीसाठी

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा ६३ वा गळीत हंगाम साखरेच्या दराबाबत घरगुती व ॵद्योगिक द्विस्तरीय दरपद्धतीची गरज – आशुतोष काळे

साखरेच्या वाढीव दराबद्दल व अवास्तव प्रचार, चिंता व टीका टिपणी करून साखरेचे दर नियंत्रित ठेवले जातात. पण त्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांचे नुकसान होते त्यासाठी शासनाने साखरेचा दर हा घरगुती वापरासाठी एक व ॵद्योगिक क्षेत्रासाठी वेगळा दर आकारून द्विस्तरीय दरपद्धती स्विकारावी असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०१७-१८ या वर्षाच्या ६३ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ संचालक व प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार अशोकदादा काळे होते. कारखान्याच्या सन २०१७- १८ या वर्षाच्या ६३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, मागील वर्षीचा गळीत हंगाम कमी झाल्यामुळे.... अधिक माहितीसाठी

कृषी प्रदर्शन शेतक-यांच्या उन्नतीसाठी उत्तम मार्गदर्शक – आशुतोष काळे

कोणत्याही शेतमालाला निश्चित दर हा मिळत नाही, त्यामुळे शेती व्यवसाय तोट्याचा झाला आहे. शेतीविषयी होणारे नवनवीन शोध शेतक-यांना वेळेवर माहिती होत नाही. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान होते. पारंपरिक शेती करतांना शेतीच्या नवीन तंत्रज्ञानाची शेतक-यांना तातडीने माहिती मिळून शेतक-यांचा फायदा व्हावा या उद्देशाने ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतक-यांच्या व कष्टक-यांचे हित जोपासण्यात घालविले असे माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे साहेव यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आलेले कृषी प्रदर्शन हे शेतक-यांच्या उन्नतीसाठी उत्तम मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कर्मवीर शंकराव काळे मित्र मंडळ गौतमनगर व महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव यांचे संयुक्त विद्यमाने साईबाबा कॉर्नर कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रियदर्शनी.... अधिक माहितीसाठी

काळे परिवार व कोसाका उद्योग समूह पाहिला की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याची अनुभूती – ह.भ.प. अॅड. शेवाळे

समाजाने समाजासाठी रचलेली स्वयंसेवी संस्था म्हणून सहकाराकडे पाहिले जाते. परंतू सध्या सहकाराचा स्वाह:कार होत चालला आहे. परंतु स्व. शंकररावजी काळे साहेबांनी राजकारण विरहीत मानस एकत्र आणून कोसाका समुहाच उभे केलेले वैभव व काळे परिवार पाहून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची अनुभूती येत असल्याचे धर्माचार्य ह. भ. प. अॅड. श्री. शंकर महाराज शेवाळे (भीमा शंकर) यांनी माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पाचव्या पुण्यस्मरण निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमात केले. कर्णाच दातृत्व व समुद्राची खोली ज्यांच्या अंतकरणामध्ये होती,ज्यांचे हात आकाशाला भिडलेले असतांना पाय मात्र जमिनीवर ठेवून स्व. साहेबांनी अवघी रयत माझी जगली पाहिजे या न्यायान आपल संपूर्ण आयुष्य वेचल. सहकाराचा यज्ञ प्रज्वलित करून त्यामध्ये आपल्या निस्वार्थ कष्टाची आहुती घालून सहकार हा स्वाहाकार नाही ही शिकवण घालून दिली. स्मृती उद्यानामध्ये साकारण्यात आलेला.... अधिक माहितीसाठी

कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नोट बंदी निर्णयाचा निषेध

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेतील काळा पैसा नष्ट करण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० व १००० रुपायांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होऊनही सर्वसामान्य जनता, शेतकरी यांच्या राहणीमानात कुठ्लाही ही फरक पडला नाही. व्यापा-यांना नोट बंदीमुळे मोठा आर्थिक फटका बसला अनेक कंपन्या नोट बंदीच्या निर्णयामुळे बंद कराव्या लागल्या त्यामुळे लाखोंना आपल्या नौक-या गमवाव्या लागून देशाचा आर्थिक विकास दरही मंदावला. या नोट बंदीच्या निषेधार्थ कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भजन करून निषेध नोंदवीत आंदोलन करून नायब तहसीलदार सुसरे यांना निवेदन देण्यात आले. देशातील काळा पैसा बाहेर काढणे, दहशतवाद मिटविणे व व्यवहरातील मोठ्या प्रमाणात असलेले बनावट चलन नष्ट करणे या उद्देशाने देशाच्या पंतप्रधांनानी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५००.... अधिक माहितीसाठी

आशुतोष काळे यांच्या हस्ते सुवर्णपदक विजेत्या डॉ. राजेश्वरी पवार यांचा सत्कार

कोपरगाव येथील डॉ. सौ. राजेश्वरी सुधीर पवार (वय वर्ष ६०) यांनी नुकत्याच म्हैसूर येथील चामुंडा हिल येथे पार पडलेल्या १४ व्या मास्टर नॅशनल अॅक्वीटीक (स्विमिंग) १०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत सुवर्णपदक व ५० मीटर मध्ये रजतपदक मिळवून कोपरगाव शहराची मान उंचाविल्या बद्दल कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी सत्कार करून डॉ. सौ. पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलया आहे. याप्रसंगी कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, डॉ. सुधीर पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गटनेते नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजाभाऊ वाकचौरे, दिनार कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते. १४ वी मास्टर नॅशनल अॅक्वीटीक (स्विमिंग) स्पर्धा नुकतीच म्हैसूर येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये २५ ते ८० वर्ष वयोगटातील जवळपास १५०० महिला–पुरुषांनी सहभाग घेतला होता. या स्विमिंग स्पर्धेमध्ये चार प्रकार असतात यामध्ये फ्री स्टाईल यामध्ये स्पर्धक कशाही प्रकारे स्विमिंग करू शकतो. यातील.... अधिक माहितीसाठी

कोपरगाव शहराच्या साठवण तलावाचे काम सुरु करा आशुतोष काळेंचे जिल्हाधिका-यांना साकडे

जायकवाडी धरण १०० टक्के भरलेले आहे. कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारी धरणेही आज मितीला तुडुंब भरलेले असूनही चार नंबर साठवण तलावाचे अपूर्ण असलयामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना पाच दिवसांनी पाणी मिळते. कोपरगावच्या नागरिकांना नियमितपणे पाणी मिळण्यासाठी चार नंबर साठवण तलावाचे काम तातडीने सुरु करावे असे साकडे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी अभय महाजन यांना घातले. कोपरगाव शहराचा दिवसेंदिवस वाढत असलेला विस्तार व वाढणारी लोकसंख्या याचा विचार करता कोपरगावच्या नागरिकांना पाणी पुरवठा करणारे साठवण तलाव भविष्यात कोपरगावच्या नागरीकांची तहान भागवू शकणार नाही अशी दूरदृष्टी असणारे माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांनाही कोपरगावच्या नागरिकांना नळाद्वारे नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी कोपरगाव शहराच्या पाणी साठवण तलाव क्रमांक चार साठी मोठया कष्टाने सव्वा दोन कोटी रुपये निधी मंजूर करून आणला होता. या.... अधिक माहितीसाठी

मोर्वीस ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित तीन सदस्य काळे गटात दाखल

नुकत्याच पार पडलेल्या २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोपरगाव तालुक्यातील मोर्वीस ग्रामपंचायतीची सत्ता काळे गटाकडून कोल्हे गटाने मिळविली. दोन दिवसांपूर्वी कोल्हे गटाचे सरपंच व उपसरपंच यांच्या निवडीही झाल्या परंतु ग्रामपंचायतीच्या सत्तेमध्ये आपल्या विरोधकच राहिला नाही या भ्रमात असणा-या कोल्हे गटाला जबरदस्त हादरा बसला आहे. कोल्हे गटाच्या नवनिर्वाचित विद्यमान तीन सदस्यांनी नुकताच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. स्थानिक नेतृत्वावर आमचा विश्वास नाही. सरपंच ,उपसरपंच निवडीच्यावेळी आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे भविष्यात विकासाच्या बाबतीत या नेतृत्वाकडून गावाचा विकास होणार नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे नवनिर्वाचित सदस्य गंगा दगडू वाघ, सौ. ललिता बाबासाहेब बर्डे, सौ. लक्ष्मीबाई बर्डे यांनी सांगितले आहे. निवड झालेले सरपंच हेसुद्धा.... अधिक माहितीसाठी

शेतक-यांनी वीज बिल भरूनही वीज रोहित्र बंद का ? - आशुतोष काळे

शेतक-यांकडे कृषी पंपाच्या थकीत विजबिल बाकी असल्यामुळे शेतक-यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन असलेले रोहित्रे बंद करण्यात आली होती. शेतक-यांनी उधार उसनवार करून कृषी पंपाची वीज बिले भरूनही कोळपेवाडी, धारणगाव, ब्राम्हणगाव, सुरेगाव, करंजी, कुंभारी, वडगाव, माहेगाव देशमुख (दोन रोहित्र), तळेगावमळे, वेळापूर, मळेगाव थडी, गोधेगाव, पढेगाव (दोन रोहित्र), हिंगणी, खोपडी, आपेगाव, शहाजापूर, लौकी आदी गावातील वीज रोहित्र आजही बंद आहे. त्यामुळे शेतक-यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून शेतक-यांनी वीज बिल भरूनही वीज रोहित्र बंद का ? असा सवाल महावितरणला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केला आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून दुष्काळाची झळा सोसणा-या शेतक-यांवर चालू वर्षीच्या पावसाळ्यात वरुणराजाने कृपा दृष्टी केल्यामुळे सर्व धरणे व शेतक-यांच्या विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. परंतु विहीर तुडुंब भरूनही शेतक-यांना आपल्या पिकांना वीज रोहित्रच बंद असल्यामुळे पाणी देता येत.... अधिक माहितीसाठी

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे चा-या उकरून द्या

मागील चार वर्षापासून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी दुष्काळाने होरपळला आहे. यावर्षी पर्जन्यमान आतिशय चांगले झाले आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बीसाठी दोन व उन्हाळी तीन आवर्तन देण्याचे ठरले आहे त्याच बरोबर शेतीसाठी पाणी देतांना मुख्य चा-या उकरून देण्याचे ठरले आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी देतांना मुख्य चा-या उकरूनच सिंचनासाठी पाणी द्यावे अशी मागणी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, नासिक यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. पाटबंधारे विभागाला दिलेल्या निवेदनात आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणा-या निर्णयानुसार आपले सिंचनाचे नियोजन करीत असतो. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्य चा-या उकरून देण्याचे ठरले असल्यामुळे बहुसंख्य शेतक-यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज भरले आहेत. ज्या ज्या शेतक-यांनी.... अधिक माहितीसाठी

मा. आ. के.बी.रोहमारे स्मृती दिनानिमित्त आयोजित बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुणे संघ अजिंक्य

कोपरगाव बॅडमिंटन क्लब व के.जे. सोमय्या व के. बी. रोहमारे महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने मा. आ. के.बी.रोहमारे स्मृती दिनानिमित्त दिनांक ९/१२/२०१७ व १०/१२/२०१७ रोजी राज्यस्तरीय दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकूण ९९ संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा अंतिम सामना पुणे व कोल्हापूर संघामध्ये होऊन या मध्ये पुणे संघाने बाजी मारीत विजय मिळविला. विजेत्या संघाला स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे २१,०००/-रुपायांचे पारितोषिक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव अॅड. संजीव कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य संदीप रोहमारे, अॅड. राहुल रोहमारे, अशोक खांबेकर तसेच कोपरगाव बॅडमिंटन क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. या स्पर्धा दोन दिवस मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार.... अधिक माहितीसाठी

शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक १४/१२/२०१७ रोजी सकाळी ७.०० वाजता आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला कोपरगाव शहर तसेच तालुक्यातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विजयी स्पर्धकांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात आले.माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी प्रवेश घेणा-या स्पर्धकांना मोफत प्रवेश देण्यात आला होता. ही स्पर्धा श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरु झाली. या स्पर्धेला युवा नेते आशुतोष काळे यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेत जवळपास एक हजाराच्या वर स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत मुलींसाठी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून श्री. छत्रपती संभाजी.... अधिक माहितीसाठी

कोपरगावमध्ये श्री साई संगीतमय कथा महोत्सवास भक्तीमय वातावरणात प्रारंभ

श्री. साईबाबा महासमाधी महोत्सव व माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पुण्यस्मरणार्थ कोपरगाव शहरातील तहसील कचेरीच्या भव्य प्रांगणात प्रियदर्शनी महिला मंडळ कोपरगाव व साई मंजिरी प्रतिष्ठान कोपरगाव यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १६/१२/२०१७ रोजी मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला कोपरगाव शहरात प्रथमच ह.भ.प.साई कथाकार कैलास महाराज राजगुरू यांच्या रसाळ वाणीतून माजी आमदार अशोकराव काळे,प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साई संगीतमय कथा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या साई कथा कार्यक्रमाचे प.पु. गुरुवर्य रमेशगिरीजी महाराज, प.पु. गोपालकृष्ण महाराज, प.पु. उंडे महाराज, ह.भ.प.साई कथाकार कैलास महाराज राजगुरू आदी महात्म्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, कोपरगाव नगरपरिषदेचे नगरध्यक्ष विजय वहाडणे, जेष्ठ पत्रकार सुरेश.... अधिक माहितीसाठी

भविष्यात मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र उभारावे लागतील – सौ. पुष्पाताई काळे

सुरेगाव येथील रयत संकुलाच्या राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी स्व. सौ. सुशीलामाई काळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे १७ वे वर्ष असून याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढे बोलतांना सौ. पुष्पाताई काळे म्हणाल्या की, राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर पाहिले की, माजी खासदार स्व. कर्मवीर शंकरराव काळे व स्व. सौ. सुशीलामाई काळे यांनी मुलींच्या शिक्षणाचे पाहिलेले स्वप्न साकार झाल्याचे वाटते. वक्तुत्व स्पर्धेच्या या वाकयज्ञातून भविष्यातील उत्तम वक्ते तयार होणार आहेत. या स्पर्धेतील सहभागी प्रत्येक स्पर्धकाला बक्षीस मिळणार नाही असे असले तरी स्पर्धकांनी जिद्द न सोडता आपली लढाई सुरूच ठेवावी कारण लढण्याचा व लढत दिल्याचा आनंद मोठा असतो. या स्पर्धेत जरी बक्षीस जिंकता आले नाही तरी श्रोत्यांची मने मात्र नक्कीच जिंकणार आहात असे सांगत स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत केला. या स्पर्धेत एकूण ११५ स्पर्धकांनी.... अधिक माहितीसाठी

कोपरगावचे साईभक्त मोठ्या संख्येने साईचरणी नतमस्तक

श्री. साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव व माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पुण्यस्मरणार्थ कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या साईकथा महोत्सवानिमित साईबाबांच्या पादुका कोपरगाव शहरात दाखल होताच हजारो साईभक्तांनी साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेवून हजारो साईभक्त साईचरणी नतमस्तक झाले. प्रियदर्शनी महिला मंडळ कोपरगाव व साई मंजिरी प्रतिष्ठान कोपरगाव यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १६/१२/२०१७ पासून शुक्रवार दिनांक २२/१२/२०१७ या सप्ताहात ह.भ.प.साई कथाकार कैलास महाराज राजगुरू यांच्या रसाळ वाणीतून माजी आमदार अशोकराव काळे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या भव्य प्रांगणात श्री साई संगीतमय कथा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त गुरुवार दिंनांक २१/१२/२०१७ रोजी सकाळी १०.०० वाजता साईबाबांच्या पवित्र पादुका साईबाबा तपोभूमी कोपरगाव येथे आणण्यात आल्या. प्रियदर्शनी.... अधिक माहितीसाठी

तंत्रज्ञान अवगत करतांना संस्कृतीचा विसर पडू न देता विज्ञानाच्या सहाय्याने समाजातील अंधश्रद्धा दूर करा –आशुतोष काळे

आजचे युग हे विज्ञान युग आहे. या विज्ञान युगात नवनवीन तंत्रज्ञान अवगत करतांना आपण आपली संस्कृती व संस्काराचा विसर पडू देवू नये. एकीकडे बुध्दीच्या बळावर वैज्ञानिक क्षेत्रात मानवाने साधलेल्या अचाट प्रगतीचे चित्र दिसत असतांना दुसरीकडे समाजात मात्र अध्यात्माच्या नावाखाली दिवसेंदिवस वाढत चाललेली अंधश्रध्दा असे चित्र दिसते. त्याचे घातक परिणाम देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करीत आहे. हे चित्र बदलून टाकण्यासाठी भावी वैज्ञानिकांनी विज्ञानाच्या सहाय्याने समाजातील अंधश्रद्धा दूर करावी असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी विज्ञान–गणित व लोकसंख्या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी केले. पंचायत समिती कोपरगाव व विज्ञान, गणित अध्यापक संघ यांचे वतीने कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी-सुरेगाव येथील श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात ४३ वे विज्ञान, गणित व लोकसंख्या शिक्षण प्रदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे.... अधिक माहितीसाठी

कोपरगाव तालुक्याचा १०० कोटीचा निधी हरविला? – आशुतोष काळे

तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी १०० दिवसात १०० कोटी निधी आणल्याच्या घोषणा करून नेहमीप्रमाणे पेपरबाजी केली होती. पण आज झगडे फाटा-वडगाव पान रस्त्यासह कोपरगाव तालुक्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था पाहिल्यास कोपरगाव तालुक्यात १०० कोटी तर सोडाच पण एक कोटीचा सुद्धा निधी तालुक्यात कुठे आल्याचे दिसत नसून कोपरगाव तालुक्याचा १०० कोटीचा निधी हरविला तर नाही ना? असा प्रश्न कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधी सौ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता विचारला. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या माजी पदाधिका-यांनी युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी व पणन महामंडळाकडे चांदेकसारे बाजार तळाच्या सुशोभीकरणासाठी निधी मागणी केली होती. कृषी व पणन महामंडळाने या मागणीचा सकारात्मक विचार करून चांदेकसारे ग्रामपंचायतीला रुपये २५ लाख निधी मजूर करून हा निधी ग्रामपंचायतीला प्राप्त झाला असून या निधीतून बाजारतळ.... अधिक माहितीसाठी

प्रेम, बंधुत्व व सलोखा जपण्याची शिकवण देणारा नाताळ सण – आशुतोष काळे

आपल्या देशात विविध जाती धर्माचे सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. प्रयेक जाती धर्माच्या सण, उत्सव साजरे करण्यामागे विशिष्ट परंपरा व धार्मिक भावना जोपासल्या जातात. त्याच प्रमाणे ख्रिश्चन बांधवही मोठ्या धार्मिक भावनेतून उत्साहात नाताळ सण साजरा करतात. हा नाताळ सण प्रेम, बंधुत्व व सलोखा जपण्याची शिकवण देणारा आहे असे प्रतिपादन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. नाताळ सणानिमित्त कोपरगाव शहर तसेच तालुक्यातील विविध चर्चेमध्ये जावून त्यांनी ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ते बोलत होते. नाताळ सनानिमित्त युवानेते आशुतोषदादा काळे यांनी कोपरगाव येथे चर्चला तसेच दयासागर मित्रमंडळातर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेलाही भेट दिली. यावेळी त्यांनी फादर व ख्रिश्चन बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी फादर रेव्हरेंट अजय भोसले, फादर जॉर्ज, दयासागर मित्रमंडळाचे अध्यक्ष योहान पाटोळे यांनी यावेळी युवानेते आशुतोषदादा काळे यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी.... अधिक माहितीसाठी

गोदाकाठ महोत्सवातून बचत गटाच्या महिलांना आर्थिक स्थैर्य - सौ. पुष्पाताई काळे

महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असून महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. हे महिलांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायात दाखविलेल्या आत्मविश्वासाला पाठबळ मिळावे व बचत गटाच्या महिलांना हक्काची बाजारपेठ मिळून महिलांना आर्थिक स्थैर्य गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून मिळत आहे असे प्रतिपादन प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी गोदाकाठ महोत्सव २०१८ च्या उदघाटन प्रसंगी केले. प्रियदर्शनी महिला मंडळ कोपरगाव यांचे वतीने महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे गोदाकाठ महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले. उदघाटन प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे, स्टार प्रवाह फेम लक्ष्य मालिकेतील सिनेअभिनेत्री धनश्री क्षीरसागर, जिल्हा परिषद.... अधिक माहितीसाठी

पंचायत समितीची नूतन इमारत कामाचा शुभारंभ ग्रामीण भागातील जनतेची स्वप्नपूर्ती – आशुतोष काळे

कोणत्याही शासकीय कार्यालयात गेल्यावर आपल्याला चांगल्या सुविधा मिळाव्या अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा असते. त्यासाठी असणारे प्रशासकीय कार्यालय सर्व सोयींनी अद्यावत असावे लागते. हा विचार डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात २०१३ मध्ये पंचायत समितीची नूतन इमारत व्हावी यासाठी ग्रामविकास मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करून सतत पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळून आज नूतन इमारतीच्या नुतनीकरन व विस्तारीकरण कामाचा शुभारंभ होत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची स्वप्नपूर्ती होऊन ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. कोपरगाव तालुका पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या कामाचा शुंभारंभ नुकताच प. पु. रमेशगिरी महाराज यांचे अनुयायी संदीपगिरी महाराज व युवा नेते आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख.... अधिक माहितीसाठी

गोदाकाठ महोत्सव महिलांना प्रगती शिखराकडे घेवून जाणारे – आशुतोष काळे

दरवर्षी गोदाकाठ महोत्सवाला महिला बचत गटांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांना आर्थिक दृष्ट्‍या सक्षम करीत असून हा गोदाकाठ महोत्सव महिलांना प्रगतीच्या शिखराकडे घेवून जात आहे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले.प्रियदर्शनी महिला मंडळ कोपरगाव यांचे वतीने महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे गोदाकाठ महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ५ जानेवारी २०१८ ते ८ जानेवारी २०१८ या कालावधीत कोपरगाव तालुक्यातील विविध महिला बचत गटांनी आपल्या तयार मालाचे स्टॉलस थाटले होते. गोदाकाठ महोत्सव सांगता समारोपात या बचत गटाच्या महिलांना युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे उपस्थित होत्या. या गोदाकाठ महोत्सवात जवळपास १२५ महिला बचत गटांचे.... अधिक माहितीसाठी

जनतेचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे सामाजिक कार्याला ऊर्जा मिळते – आशुतोष काळे

सहकार क्षेत्रात अग्रगण्य असण-या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असतांना तसेच सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असतांना कोपरगाव तालुक्यातील जनतेचे मिळत असलेले सहकार्य, प्रेरणा व आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. कोपरगाव तालुक्याच्या जनतेचे आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे मला सामाजिक क्षेत्रात काम करत असतांना एक ऊर्जा मिळत असून या उर्जेच्या जोरावरच मला विविध संस्थांवर काम करण्याची संधी मिळत आहे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्या चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. पोहेगाव ग्रामस्थ व परीसरातील नागरिकांच्या वतीने आशुतोष काळे यांची रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य, दि डीस्टीलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे उपाध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूगव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याबद्दल व इंटीग्रेशन पीस इन्स्टिट्यूट यांच्या वतीने दिला जाणारा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम एक्सलंस पुरस्कार मिळाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार.... अधिक माहितीसाठी

रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान – सौ. चैतालीताई काळे | स्व.सौ.सुशीलामाई काळे यांच्या पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

आजच्या काळात वाढते अपघात आणि विविध आजारांमुळे मानवी रक्ताच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. स्वेच्छेने रक्तदान करणा-या रक्तदात्यांची संख्याही कमी झाली आहे. रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नसून हे फक्त मानवी शरीरातच तयार होते. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदात्यांनी केलेले रक्तदान गरजू व्यक्तींचे प्राण वाचवून त्या व्यक्तीला जीवनदान देते त्यामुळे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले. कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट व श्री. साईबाबा संस्थान रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. सौ. सुशीलामाई काळे यांच्या १९ पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दान अनेक प्रकारचे आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, रक्तदान सोडले तर सर्वच दान संपणारे असून केवळ रक्तदान.... अधिक माहितीसाठी

सत्कारामुळे जबाबदारी वाढत असल्याची जाणीव - आशुतोष काळे

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेचे मिळत असलेले प्रेम, सहकार्य व आशीर्वादाच्या जोरावर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याची प्रेरणा मिळत असून मला विविध नामांकित संस्थांवर काम करीत असण्याची मिळत असलेली संधी व मिळत असलेले पुरस्कार हे जनतेच्या प्रेमाचे प्रतीक असून होत असलेल्या सत्कारामुळे माझी जबाबदारी निश्चित वाढली असल्याची जाणीव होत असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी राहाता तालुक्यातील वाकडी येथे जाहीर नागरी सत्काराला उत्तर देतांना म्हटले. .वाकडी ग्रामस्थ व परीसरातील नागरिकांच्या वतीने आशुतोष काळे यांची रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य, दि डीस्टीलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे उपाध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याबद्दल व इंटीग्रेशन पीस इन्स्टिट्यूट यांच्या वतीने दिला जाणारा डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम एक्सलंस पुरस्कार मिळाल्याबद्दल वाकडी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांच्या वतीने.... अधिक माहितीसाठी

दर्जेदार शिक्षण देणारी शिक्षणाची पंढरी उभारणार –आशुतोष काळे

माजी खासदार स्व. शंकररावजी काळे साहेबांनी ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे म्हणून कर्मवीर एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून गौतम पब्लिक स्कुल सुरु केले. या एज्युकेशन सोसायटीचे वटवृक्षात रूपांतर होऊन ही एज्युकेशन सोसायटी आज कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी या नावाने ओळखली जात असून या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात आपले आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. संस्थेचे उच्च माध्यमिक विद्यालय, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट व विविध माध्यमिक विद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी आपले शिक्षणाचे स्वप्न करीत आहे.पण आता यावरच थांबणे संयुक्तिक नसून भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून एकाचवेळी १५ हजार विद्यार्थी विविध प्रकारचे व्यावसायिक दर्जेदार शिक्षण घेवू शकतील अशी शिक्षण पंढरी उभारणार असल्याचा आपला मानस आहे असे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त युवा नेते आशुतोष काळे यांनी सांगितले. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन.... अधिक माहितीसाठी

सकारात्मक विचार करा, यश हमखास मिळेल – आशुतोष काळे

मनात ठरविलेली कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल सकारात्मक विचार करणे गरजेचे असून सकारात्मक विचार असले तर या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुम्ही सकारात्मक विचार करा तुम्हाला यश हमखास मिळेल असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी स्व. सौ. सुशिलामाई काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान कोळपेवाडी येथे वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. याप्रसंगी कोपरगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक कु. अर्चना करपुडे प्रमुख अतिथ Home | Ashutosh Ashokrao Kale

समस्या निवारण

जर तुमच्या परिसरात किंवा अवतीभवती किंवा तुम्हा स्वतःला काही समस्या असतील तर त्या तुम्ही आम्हाला नक्की सांगा..... अधिक माहितीसाठी

माझ्याशी संपर्क करण्यासाठी

श्री. आशुतोष काळे, हे आपल्याला परिचित आहेत. कोपरगाव तालुक्यातील काळे कुटुंबियांची ओळख सर्वांना आहेच. सचोटीने आपला उद्योग व्यवसाय करण्याबरोबर आपण आपल्या समाजाचे ,राष्ट्राचे काही देणे लागतो आणि ते आपण आपल्या परीने देण्याचा प्रयत्न करावा आणि सामाजिक बांधिलकी मानून काही समाज सेवा करावी हा संस्कार श्री. आशुतोष काळे यांना घरातूनच मिळाला....अधिक माहितीसाठी

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

माजी खासदार शंकररावजी काळे साहेब

कै . शंकररावजी काळे साहेब यांचा जन्म ६ एप्रिल १९२१ रोजी माहेगाव देशमुख, तालुका कोपरगाव येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांची बुद्धिमता ओळखून त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणाची संधी दिली. आणि या संधीचा फायदा घेऊन त्यांनी बीएस्सी, बी.ई. सिविल ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी २ वर्षे सरकारी नोकरी केली. पण नोकरीत मन रमेना. लोकांच्या हितासाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून ते नोकरी सोडून गावी आले व आपले जीवन समाजकार्याला अर्पण केले. सर्वप्रथम त्यांनी १९५३ मध्ये माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सोसायटी ची स्थापना केली आणि आपल्या.... अधिक माहितीसाठी

माजी आमदार अशोकदादा काळे

माजी आमदार अशोकदादा काळे यांनी त्यांचे वडील माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांचा समाजकारणाचा वसा पुढे चालवत तालुक्याच्या विकासात मोठ्या प्रमाणात योगदान दिले. सर्वसामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी काम करण्याची त्यांची बांधिलकी बघून जनतेने त्यांना २ वेळा आमदार होण्याची संधी दिली. सन २००४ ते २०१४ मध्ये कोपरगाव तालुक्याचे आमदार राहिले. कोपरगाव तालुक्याचा विकास साधतांना कोपरगाव शहर आणि तालुक्याचा ग्रामीण भाग एकमेकाना जोडून कसा विकास साधता येईल या विचारातून माजी आमदार अशोकराव काळे यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत अनेक वर्षापासून प्रलंबित.... अधिक माहितीसाठी

कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकास

कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याचा विकास करण्यासाठी मला साथ द्या..... माझ्याविषयी थोडेसे

Facebook

Instagram

© 2017 All Rights Reserved.
Design and Developed by Aqurust Software
Visit Counter : Public School 900